Home Breaking News कार मोटारसायकल अपघात, अनियंत्रित कार ने घेतला एकाचा बळी

कार मोटारसायकल अपघात, अनियंत्रित कार ने घेतला एकाचा बळी

233
0

विशेष प्रतिनिधी रामटेक :

: रामटेक – तुमसर मार्गावर अंबाला वळण येथे रामटेक कडुन खिंडसीकडे जात असलेल्या इसमाचा अपघातात मृत्यू. रामटेक तुमसर मार्गावर अंबाला वळण येथे दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ च्या दुपारी एका मोटारसायकल ने जाणाऱ्या ४७ वर्षीय इसमास मागुन येणार्‍या अनियंत्रीत कार ने जबर धडक दिल्याने इसमाचा मृत्यु झाल्याची घटना घडली. सदर अपघात हा दुपारच्या वेळेस झाला असून सदर अपघात हा वळण मार्गावर झाला आहे. घटनास्थळी वाहनाची प्रत्यक्षदर्शी पाहणी करता असे लक्षात येते की सदर कार चा वेग हा अतिशय जास्त असावा या कारणाने वळणावर त्याची कार अनियंत्रित झाली असून त्याने आपले समोर मोटारसायकल ने जाणाऱ्या इसमास जोरदार धडक दिली, ज्यात मोटारसायकल चालक इसम हा रस्त्याचा खाली जाऊन पडला असावा की अपघात स्थळी मोटारसायकल आणि कार ची पाहणी केली असता, मोटारसायकल ही कार खाली दबली असल्याचे लक्षात येते. यावरून धडक आणि कार चा वेग किती जास्त असावा. ज्यात मोटारसायकल चालक आनंद जनार्दन जगताप वय ४७ रा. वॉटर सप्लाय कॉर्टर नवरगाव असे मृतकाचे नाव आहे. तो नगर परिषदेच्या पाणिपुरवठा विभागांतर्गत कार्यरत होता. आज दि. ५ नोव्हेंबर ला आनंद ला रामटेक कडुन खिंडसीकडे जायचे होते मात्र त्याची दुचाकी नादुरुस्त असल्याकारणाने त्याने मित्राची दुचाकी घेतली व खिंडसी मार्गाने निघाला. दरम्यान अंबाळा वळना जवळ त्याची दुचाकी येताच मागुन एम.एच.३१ पी.आर. ८८६७ क्रमांकाच्या कार ने दुचाकीला जबर धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकी अक्षरशः कार च्या समोरील भागाखाली फसून गेलेली होती. आनंदच्या मृत्यू पश्चात त्याचा मागे त्याचे आई, वडील, पत्नी, दोन मुले एक पाचव्या वर्गात तर एक तिसऱ्या वर्गात आहेत. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Previous articleरामटेक येथे जयभीम पहाट जल्लोषात साजरी
Next articleयशवंतराव होळकर यांची 248 वी जयंती साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here