Home Breaking News रामटेक येथे जयभीम पहाट जल्लोषात साजरी

रामटेक येथे जयभीम पहाट जल्लोषात साजरी

167
0

विशेष प्रतिनिधी – रामटेक/नागपूर (Ramtek/Nagpur)

: रामटेक, दिनांक: १/१०/२०२३ बाबासाहेबांचा विचाराने भारावलेल्या भीमसैनिक तरुणाच्या प्रयत्नांतून १ ऑक्टोबरला रामटेक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रथमच ‘जयभीम पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ६:३० वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना पठण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमादरम्यान नागपूर येथील गायक तन्मय चिचखेडे, सारीपुत्त वानखेडे, प्रणय शंभरकर, रमाईच्या लेकी ग्रूप, लिटिल रॅपर, रॅपर तेज कट्टर, बीट रॅपर, बाबांची लेकरं टीम मनसर, भिमाई लेझिम ग्रूप कामठी, मोटिवेशनल स्पीकर प्रियांशु शेंडे, डान्स वेब क्रेव कामठी आणि डीजे रोहित, डीजे विप्लव, डीजे सागर तसेच सर्व कॅमेरा टीम यांनी आपल्या कलेचे उत्तम सादरीकरण केले. यावेळी संपूर्ण तालुक्यातून हजारोंच्या संख्येने तरुणांनी सहभाग घेतला. जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर गुंजत होता.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजन समितीचे अमित अंबादे, प्रयास ठवरे, पुनम अंबादे, अतुल धमगाये, ॲड. प्रफुल्ल अंबादे, साक्षोधन कडबे, डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. वैशाली बोरकर, पत्रकार जगदीश सांगोडे, अनिल वाघमारे, नरेंद्र मेश्राम, मंगेश गजबे, सोपान चौहाण, अनिल ढोके, राहुल जोहरे, अश्विन सहारे, राजा सांगोडे, दीपक सहारे, अश्विन मेश्राम, नीरज बांगरे, अरविंद सांगोडे, महेंद्र वासनिक, सूरज भिमटे, अमर सहारे, मनीष खोब्रागडे, अतुल ढोके, सुनीता डोंगरे, मयुरी पाटील, अंकिता डोंगरे, दीपा चौहान, स्मिता जिभे, विजिता मेश्राम, राकेश साखरे, तसेच तालुक्यातील समस्त भीमसैनिकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजर असलेल्या उपस्थितांचे, समस्त कलावंतांचे तसेच कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणारे सामाजिक कार्यकर्ता मयंक देशमुख यांचे आयोजन समिती तर्फे आभार मानण्यात आले.

Previous articleपवनी मे ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियान के तहत अमृत कलश में घर-घर से लायी मिट्टी की संग्रहित
Next articleकार मोटारसायकल अपघात, अनियंत्रित कार ने घेतला एकाचा बळी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here