Home Breaking News भरपावसळ्यात सोनेगाव वासियांवर पाणी टंचाई, दमदार झालेल्या पावसाने शासकीय विहिरीत गेली माती

भरपावसळ्यात सोनेगाव वासियांवर पाणी टंचाई, दमदार झालेल्या पावसाने शासकीय विहिरीत गेली माती

217
0

विशेष प्रतिनिधी

पारशिवनी /नागपूर (Parseoni/Nagpur) :- 
दिनांक १५ सप्टेंबर :
पारशिवनी तालुक्यातील सोनेगाव येथे मागील पाच दिवसापासून भर पावसाळ्यात घरगुती नळ बंद असल्याने सर्वत्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी गावातील शासकीय विहिरी बुजविण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. नागरीकांना मिळेल तेथून पाणी आणुन आपली कशीबशी व्यवस्था करीत असल्याचे दिसून येत आहे. या पाण्याने नागरिकाच्या आरोग्यास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गावात येणारे नळ पाणीपुरवठा योजना चे पाणी गावापासून ३ की.मी.अंतरावर शासकीय विहीर असून त्या विहिरीतील मोटार मध्ये बिघाड झाल्यास त्या रस्त्याने पावसाळ्यात कोणतेही साधन जात नाही. अनेकदा सबंधित विभागाला पत्राचार करून आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसून रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. सद्या पांदन रस्ता असून कोणत्याही शासकीय अधिकारी जर मोटार दुरुस्तीसाठी जाण्यास योग्य रस्ता नसल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित रहावे लागते.
मागील पाच दिवसापासून सतत पाऊस असल्याने विहिरीच्या सभोवतील पाण्याने पूर्ण माती वाहून गेली आहे.व काही माती विहिरीतील मोटारीवर गेल्याने बंद पडली असून गावातील पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायत व सबंधित विभागाला माहिती देण्यात आली. मात्र दोन महिने लागणार असल्याचे सबंधित विभाग सांगत असून, सद्या गावकऱ्यांनी काय करावे ? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

पावसामुळे माती खासलेली विहीर

गावातील नळ पाणीपुरवठा योजना तातडीने दुरुस्त करण्याची मागणी सबंधित विभागाला उपसरपंच परिता इंगोले, खरेदी विक्री संघाचे संचालक चंद्रभान इंगोले, माजी उपसरपंच विजय ठाकरे, ग्रापस.उमेश ठाकरे, माजी सरपंच मंगला खंडाते, केशव शिंदे, हरीचंद्र घेर, भारत इंगोले, नारायण ठाकरे, पांडुरंग गीऱ्हे, विजय आमले, संदीप आमले, रामकृष्ण इंगोले, प्रभाकर ठाकरे, रामराव काळमेघ, संजय आमले, सेवक शिंदे, यादवराव इंगोले, नारायण आमले, निलेश ठाकरे, भारत इंगोले, पंकज आमले, प्रदीप मेश्राम, किशोर इंगोले, रवी महाजन, फिरोज वासनिक, किसन मेश्राम, संदीप शिंदेमेश्राम, दिलीप मेश्राम, रमेश इंगोले, अमोल ठाकरे, सेवक वासनिक, बापू धरमारे इत्यादी सह ग्रामस्थांनी केली आहे.

Previous article*भाजपा तर्फे मौदा परिसरातील शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही साठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन*
Next articleनाकाबंदी के दौरान पकडे गए, अवैध मवेशी भरके ले जाती गाडी, देवलापार पोलिस की कडी कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here