Home Breaking News *भाजपा तर्फे मौदा परिसरातील शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्यावर कायदेशीर...

*भाजपा तर्फे मौदा परिसरातील शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कर्ज उचलून फसवणूक करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही साठी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन*

130
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक/नागपूर (Ramtek/Nagpur ) :-  भाजपा रामटेक विधानसभा तर्फे शेतकऱ्यांची फसवणूक करून लुबाडणाऱ्या आरोपीला अटक करून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदन देण्यात आले.  रामटेक येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयात भारतीय जनता पक्षाच्या वतीने
रामटेक, पारशिवनी, मौदा तालुक्यातील १५० शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या कर्जामध्ये फसवणूक करणारी बातमी मागील एक सप्ताह पासून विविध दैनिक पेपर मध्ये प्रकाशित झाली असून यांचेवर मौदा पोलीस स्टेशन येथे दि. ३०/०८/२०२३ ला गुन्हा दर्ज केला असून यावर त्वरीत पोलीस विभागाकडुन आरोपींना अटक करण्यात यावी. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यावर कार्यवाही करून बँक कर्जा मध्ये फसवणुक झालेल्या शेतकऱ्यांची महाराष्ट्र शासनाकडुन गंभीर दखल घेवून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करावे व शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

उपविभागीय अधिकारी कार्यालयात श्री. मल्लिकार्जून रेड्डी (माजी आमदार रामटेक विधानसभा), भाजपा जिल्हाउपाध्यक्ष संजय मुलमुले, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, पंचायत समिती सभापती तथा तालुकाध्यक्ष श्री.नरेंद्र बंधाटे, माजी जिल्हापरिषद सदस्य योगेश वाडिभस्मे, लक्ष्मण केने सर (अध्यक्ष,भाजपा देवलापार मंडळ), जिल्हापरिषद सदस्य सतीश डोंगरे, रींकेश चवरे, नंदकिशोर कोहळे, उमेश कुंभलकर, रामानंद अडामे, वसंता कोकोटे, संजय बिसमोगरे, करीम मालाधारी, आलोक मानकर, सुखदेव शेंद्रे, सुधीर अवस्थी, गुरुदेव चकोले, उमेश कुंभलकर, शिवाजी चकोले, अजय शेंद्रे, गौरीशंकर गयगये सह आदी भाजपा कार्यकर्ते व शेतकरी बांधव

उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देताना रामटेक भाजप कार्यकर्ता

संख्येने उपस्थित होते.

 

Previous articleमनसर येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा वाढदिवस साजरा
Next articleभरपावसळ्यात सोनेगाव वासियांवर पाणी टंचाई, दमदार झालेल्या पावसाने शासकीय विहिरीत गेली माती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here