Home Breaking News फुले चौक येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

फुले चौक येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण

385
0

पारशिवणी/नागपूर (Parseoni/Nagpur):- स्वतंत्र दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. दरवर्षी प्रमाणे फुले चौक टेकाडी येथे ध्वजारोहण करण्यात आला. सर्वप्रथम भारत मातेच्या व महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात येऊन लगेच ध्वजारोहण करण्यात आले नंतर झेंडा सलामी देण्यात आली व झेंडागाणं राष्ट्रगीत घेण्यात आले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या शहीद हुतात्माच्या कार्यांना त्यांना उजेडा देण्यात आला बालगोपालांना स्वातंत्र्या आधीची परिस्थिती व स्वातंत्र्यानंतरची परिस्थिती बद्दल या विषयावर थोडक्यात माहिती देण्यात आली.  यावर्षी विशेष म्हणजे दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  12वीतील  गुणवंत विद्यार्थिनी श्रेया गजानन गजभिये तर 10वीतील गुणवंत विद्यार्थिनी मनस्वी ईशाधर कांबळे यांनी ध्वजारोहण केले कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील सरपंच विनोद इनवाते प्रमुख उपस्थिती उपसरपंच जितेंद्र चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे, शितल सातपैसे, कुणाल वासाडे, अर्चना सुधाकर वासाडे, संध्या सिंग, माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश चिमोटे, आशा राऊत, उमेश एकनाथ गुरधे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशा चव्हाण यांनी केले यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व गुरुकृपा आखाडा येथील विद्यार्थी उपस्थित होते, उज्वल कांबळे सुरज चव्हाण, अनिकेत निमजे, सिद्धार्थ साथपैसे, वरद आकोटकर, मोनाली आकरे, सोनम गुरुदे, जिया कांबळे, श्रेया हुड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleश्रीरामजी अस्टनकर यांच्या आठवणींना उजाळा व कवितांचे अभिवाचन
Next articleमनसर येथे भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांचा वाढदिवस साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here