Home Breaking News सभापती संजय नेवारे अपात्र घोषित, उपसभापती नरेंद्र बंधाटे यांच्याकडे असणार पंचायत समिती...

सभापती संजय नेवारे अपात्र घोषित, उपसभापती नरेंद्र बंधाटे यांच्याकडे असणार पंचायत समिती रामटेकचा सभापती पदाची धुरा

46
0

नागपूर/ रामटेक – दि.11 ऑगस्ट रामटेक पंचायत समितीच्या सभापती संजय नेवरे अपात्र. इको कलबविभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी रामटेक पंचायत समितीच्या शिवसेना (शिंदे गट) आणि आमदार आशिष जयस्वाल यांच्या निकटवर्ती यांना अनुसूचित जमातीचे जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने 8 ऑगस्ट 2023 रोजी सभापती संजय नेवारे यांना अपात्र घोषित केले. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला. उपसभापती पद माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आणि भाजपचे नरेंद्र बंधाटे यांच्याकडे आहे. आता त्यांच्याकडे सभापती पदाची जबाबदारी असणार आहे. गट विकास अधिकारी (बिडीओ) जयसिंग जाधव यांना सभापतींबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, विभागीय आयुक्तांकडून सभापती संजय नेवारे यांना अपात्र ठरवण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.

विशेष बाब म्हणजे बोथिया (पालोरा) अंतर्गत पंचायत समितीचे सदस्य म्हणून, संजय नेवारे यांनी 7 जानेवारी 2020 रोजी अनुसूचित जमातीच्या राखीव जागेवर निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र इतके वर्ष उलटूनही त्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. तक्रारदार मुकेश मडावी व मुकेश पेंदाम देवलापार यांनी संजय नेवारे यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विभागीय आयुक्त कार्यालयात केली होती. शेवटी तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या अहवालावरून विभागीय आयुक्तांनी चौकशी करून साडेतीन वर्षे पूर्ण होऊनही जातवैधता सादर न केल्याने 8 ऑगस्ट 2023 रोजी विभागीय आयुक्तांनी संजय नेवारे यांना पंचायत समिती सदस्य व सभापती पदासाठी अपात्र घोषित केले.

Previous articleसमाजसुधारक महात्मा फुले व विविध संघटना द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी केले रक्तदान
Next articleमहाविद्यालया द्वारा ‘मेरी माटी मेरा देश’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here