Home Culture बी के सी पी शाळेत योगा दीन साजरा

बी के सी पी शाळेत योगा दीन साजरा

321
0

पारशिवणी/ कन्हान – कन्हान ता. पारशिवनी येथील बी.के.सी.पी शाळेत बुधवार ता. 21 ला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी योगविषयीचे महत्त्व विशद करण्यात आले. संयुक्त राष्ट्र संघाने सन 2015 पासून जगभरात हा दिवस योग दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले. योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे .

21 जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी शारीरिक व्यायाम आणि योगासने केली .

यामध्ये हायस्कूल विभागाची मुख्याध्यापिका कविता नाथ, प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका रुमाना तुर्क, शारीरिक शिक्षक -अमित राजेंद्र ठाकूर, सविता वानखेडे , रेणू राऊत या सर्वांनी प्रत्यक्षरित्या सहभाग घेतला.

Previous articleविद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर कलाकृती…एकता गणेश उत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
Next articleसमाजसुधारक महात्मा फुले व विविध संघटना द्वारा आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी केले रक्तदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here