Home Breaking News विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर कलाकृती…एकता गणेश उत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर कलाकृती…एकता गणेश उत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

57
0

विशेष प्रतिनिधी :

गुमगाव/नागपूर ( Gumgaon/Nagpur) :–  येथील एकता गणेश उत्सव मंडळ द्वारा आयोजित ‘टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू’ बनविण्याच्या स्पर्धेचा उपक्रम राबविण्यात आला.सर्वांसाठी खुल्या असलेल्या स्पर्धेत गुमगाव,कोतेवाडा,वागदरा, धानोली,कान्होली,वडगांव, गुजर, दाताळा, सालईदाभा, डोंगरगाव, खडका, सुमठाणा, किरमटी, खापरी, बेला, शिवमडका, बुटीबोरी, शिरुळ, हिंगणा, दृगधामना, नागपूर, यवतमाळ येथील ७१ शालेय व महाविद्यालयालयीन विद्यार्थी, महिला, पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला.घरात व आपल्या आजूबाजूला आढळणाऱ्या टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर केल्यास व त्यावर कलाकृती केल्यास त्या वस्तूंना महत्त्व व सौंदर्य प्राप्त होत असल्याचे स्पर्धकांनी आपल्या नाविन्यपूर्ण कलाकृतीतून दाखवून दिले.

स्पर्धेत अंगणवाडी शिक्षिका संगीता इटनकर,कला शिक्षिका कोमल ढवळे परीक्षकांची भूमिका बजावत असून स्पर्धेचा अंतिम निकाल २५ जून रोजी घोषित केला जाणार असल्याने स्पर्धकांची उत्कंठा वाढली आहे.

बातमी संकलन : रवींद्र कुंभारे 

Previous articleशेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या लाभ घ्यावा…आमदार सुनील केदार यांचे आव्हान,सावनेर येथे जिल्हास्तरीय कृषी व पशु पक्षी मेळावा
Next articleबी के सी पी शाळेत योगा दीन साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here