Home Breaking News शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या लाभ घ्यावा…आमदार सुनील केदार यांचे आव्हान,सावनेर येथे जिल्हास्तरीय कृषी...

शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या लाभ घ्यावा…आमदार सुनील केदार यांचे आव्हान,सावनेर येथे जिल्हास्तरीय कृषी व पशु पक्षी मेळावा

335
0

विशेष प्रतिनिधी :

सावनेर /नागपूर (Saoner/Nagpur) :- सावनेर येथे दिनांक  4/06/2023 ला कृषी पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद नागपूर व पंचायत समिती सावनेर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी, पशुपक्षी मेळावा व प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन 14 जून रोज बुधवार ला कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा सावनेर विधानसभेचे आमदार सुनील केदार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकड्डे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अभिजीत वंजारी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, महिला बालकल्याण सभापती अवंतिका लेकुरवाळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पंचायत समिती सभापती अरुणा शिंदे, उपसभापती राहुल तिवारी, जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई सिरसकर आदींची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपक्षी व दुग्ध जनावरे पाळावी यातून आपला स्वयंरोजगार निर्माण करावा. याबाबत शासन विविध योजना राबित असून शासनाच्या विविध योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा.असे आव्हान याप्रसंगी सावनेर विधान सभा क्षेत्राचे आमदार सुनील केदार यांनी केले.

मेळाव्यात पशुपक्षी जनावरे यांचे भव्य प्रदर्शन तसेच कृषी संबंधित विविध शेती उपयोगी साहित्य अवजारे अशा विविध प्रकारचे 200 च्या जवळपास स्टाल लागले होते.हजारोच्या संख्येने मेळाव्यात शेतकऱ्यांची गर्दी उसळली होती.यादरम्यान शेतकऱ्यांना बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी कर्मचारी, पशुसंवर्धन व कृषी विभाग तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व पदाधिकारी आदींची उपस्थित होती.

बातमी संकलन : किशोर गणविर

Previous articleव्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री रामटेक येथे विभागीय आढावा बैठक
Next articleविद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केल्या सुंदर कलाकृती…एकता गणेश उत्सव मंडळाचा नाविन्यपूर्ण उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here