Home Breaking News व्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री रामटेक येथे विभागीय...

व्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री रामटेक येथे विभागीय आढावा बैठक

151
0

विशेष प्रतिनिधी :

*पावसाळ्यापूवी जलयुक्तच्या कामांना पूर्ण करण्याचे आवाहन*

रामटेक/नागपूर (Ramtek/Nagpur) :– रामटेक येथील गंगा भवन सभागृह रामटेक येथे शासन प्रशासनाद्वारे सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांच्या प्रगतीच्या आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवार दिनांक 11 जून 2023 ला शासकीय आढावा बैठक संपन्न झाली यात सर्वप्रथम निशुल्क जमीनपट्टे वाटप काही योजनांचे धनादेश वाटप घरकुलाची किल्ली वितरित करण्यात आले. प्रधानमंत्री आवास योजना, शेती व घरकुल पट्टे वाटप योजनांसारख्या शासनाच्या अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत गतीने पोहचवण्यासाठी योग्य नियोजन करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामटेक येथील उपविभागीय आढावा बैठकीत केले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या मे महिन्यात १९ व २० मे रोजी हिंगणा, उमरेड, सावनेर, काटोल या उपविभागाच्या मान्सून पूर्व आढावा बैठकी घेतल्या होत्या. आज रामटेक येथील उपविभागाच्या बैठकीत शासनाच्या विविध पथदर्शी योजनांचा आढावा त्यांनी घेतला.
रामटेक येथील गंगाभवन येथे आयोजित उपविभागीय स्तरावरील या बैठकीला खासदार कृपाल तुमाने, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष जायस्वाल, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.नागपूर सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अप्पर जिल्हाधिकारी आशा पठाण, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रभू शुक्ला, माजी आमदार मलिकार्जुन रेड्डी यांच्यासह जिल्हा व उप विभागीय अधिकारी तसेच सर्वच शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते.
उपविभागीय अधिकारी वंदना सौरंगपते यांनी आढावा सभेचे सादरीकरण केले. आढावा बैठकीत वाळू व इतर गौण खनिज धोरणाची अंमलबजावणी, अमृत सरोवर अभियान, जलयुक्त शिवार योजना, पी एम किसान प्रगतीचा आढावा, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, पाणंद रस्ते, संजय गांधी निराधार अनुदान योजना, वैयक्तिक वन हक्क कायदा व सामूहिक वन हक्क कायद्याची अंमलबजावणी, गाव तेथे स्मशानभूमी, टँकर व विहीर अधिग्रहण, सर्वांसाठी घरे, राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन कार्यक्रम, रोजगार हमी योजना, मनरेगा, प्राथमिक आरोग्य, कृषी विभागांतर्गत खरीप हंगाम पेरणी, बियाणे व खताची उपलब्धता, पुरवठा विभागाअंतर्गत अंतोदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना, सेतू केंद्र, कोतवाल नियुक्ती, पोलीस पाटील नियुक्ती, स्वच्छ भारत मिशन अभियान, शासन आपल्या दारी योजना आदि योजनांचा आढावा याप्रसंगी घेण्यात आला.

Previous articleविनायकराव देशमुख हायस्कूलचे सुयश …बारावीचा निकाल १०० टक्के तर दहावीचा ८९ टक्के
Next articleशेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांच्या लाभ घ्यावा…आमदार सुनील केदार यांचे आव्हान,सावनेर येथे जिल्हास्तरीय कृषी व पशु पक्षी मेळावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here