Home Breaking News विनायकराव देशमुख हायस्कूलचे सुयश …बारावीचा निकाल १०० टक्के तर दहावीचा ८९ टक्के

विनायकराव देशमुख हायस्कूलचे सुयश …बारावीचा निकाल १०० टक्के तर दहावीचा ८९ टक्के

154
0

विशेष प्रतिनिधी :

नागपूर(Nagpur) :- लकडगंज,नागपूर येथील विनायकराव देशमुख हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी बारावी आणि दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश संपादित करीत यशाची परंपरा कायम ठेवली.शाळेचा बारावीचा १०० टक्के तर दहावीचा ८९ टक्के निकाल लागल्याने शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवली.शाळेतून श्रेयांश इंद्रजित मुळे या विद्यार्थ्याने ९०.६० टक्के गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला तर निरंजय संजय गोधनकरने ८८.२० टक्के गुण मिळवित द्वितीय तर ८५ टक्के गुण मिळवित चैतन्यश्री प्रमोदसिंग चव्हाणने तृतीय क्रमांक मिळविला.सोबतच प्रतीक भूमानंद गुरनुले ८४.६० टक्के,प्राची बबन हिवसे ८३.८० टक्के,लकी बिरजू प्रसाद ८२.६० टक्के,स्पर्श सुरेश मुर्रे ८०.८० टक्के,सोनू चंद्रहास्य टेंभुरकर ७७.८० टक्के,रोहित रुपचंद खोब्रागडे ७७.४० टक्के,अनुष्का रत्नाकर मोहूर्ले ७७.४० टक्के, अभिषेक सुखदेव दुरबुडे ७७ टक्के, भाग्यश्री ज्ञानेश्वर दादूरे ७६.६० टक्के आणि भूमिका नरेश गौरीकरने ७५.२० टक्के गुण प्राप्त करीत घवघवीत यश संपादित केले.शाळेचे निसर्गरम्य वातावरण, पारंपारिक शिक्षण शैलीसह आधुनिक तंत्रज्ञानाने विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धती, भव्य क्रीडांगण तसेच विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासावर देण्यात येणारे लक्ष हे या शाळेची वैशिष्ट्ये आहेत.संस्थाध्यक्ष अविनाश देशपांडे, संस्था सचिव दत्तात्रय मुळे,शाळेचे मुख्याध्यापक समीर कोठे,उपमुख्याध्यापक प्रमोद मारोडकर,पर्यवेक्षक मंगेश बावसे, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शाळेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केेले.

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवणी वर सभापती पदी अशोक चिखले तर उपसभापती पदी सुभाष तडस यांची बिनविरोध निवड.
Next articleव्यक्तिगत लाभाच्या योजनांची कामे गतीने पूर्ण करा : उपमुख्यमंत्री रामटेक येथे विभागीय आढावा बैठक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here