Home Breaking News सीबीएसई हायस्कूलचा RTE 25% चा घोटाळा, बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क हिरावला!

सीबीएसई हायस्कूलचा RTE 25% चा घोटाळा, बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क हिरावला!

223
0

विशेष प्रतिनिधी :

कोंढाली/नागपूर (Kondhali/Nagpur) :- आर्थिक वंचित गटातील विद्यार्थ्यांना १० पर्यंत मोफत शिक्षणाची सुविधा व्हावी. यासाठी, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ ( RTE ACT 2009 ) नुसार दरवर्षी RTE 25% प्रवेश प्रक्रिया नुसार अनेक विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येतो. यात शाळेची फी, गणवेश, पाठ्यपुस्तके मोफत असते मात्र या सर्व नियमांचे कोणत्याही शाळेने उल्लघंन केल्यास शाळेकडून दहा पट दंड वसूल करण्याचा अधिकार शासनाला आहे. मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील नावलौकिक असलेली सीपी ॲन्ड बेरार एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लाखोटीया भुतडा सीबीएसई हायस्कूल मागील अनेक वर्षांपासून RTE 25 % अंतर्गत प्रवेश प्राप्त शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांची दिशाभूल करुन शिक्षणाच्या नावाखाली बळजबरीने लाखो रुपये वसूली केली जात आहे. या सर्व प्रकरणाची तक्रार संबंधित शिक्षण विभागाला करण्यात आली असून शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून प्रकरण अंगलट आल्याने प्रकरण दडपण्याचा उद्देशाने शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी, शाळा सोडून गेलेले व शाळा शिकत असलेल्या शेकडो विद्यार्थ्यांच्या घरी शाळेच्या लेटर पॅड वर RTE 25% प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांचे तुम्ही भरलेले तुमचे रुपये घेऊन जावे असे पत्र पाठविले असून पत्र वाचून अनेक पालक वर्ग आच्छर्यचकीत झाले असून इतक्या वर्षांनी पैसे कसे परत मिळत आहे तर अनेक पालकांना RTE 25% अंतर्गत प्रवेश मिळाला होता याची माहितीच नव्हती. यामुळे शाळेने नियमांचे उल्लघंन करून आमच्याशी धोकेबाजी केली असा सवाल त्यांच्या समोर उभा झालेला आहे मात्र शाळेने नियमांचे उल्लघंन करून शेकडो पालक वर्गा कडून लाखो रुपये वसूली कडून त्यांच्या पैशाचा वापर करून आज इतक्या वर्षांनंतर तेवढेच पैसे परत करण्याऐवजी चार पटीने कां परत करू नये? असा प्रश्न पालक वर्गा कडून उपस्थित केला जात आहे. माझा मुलगा किंवा मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकला पाहिजे अशी प्रत्येक पालकाची इच्छा असते यासाठी तो राबराब कष्टही करतो मात्र आज शिक्षणाच्या नावाखाली शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने व नावलौकिक असलेल्या शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आल्याने शाळेच्या कारभारावर प्रश्न चिन्ह निर्माण केल्या जात आहेत. तर नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथील लाखोटिया भुतडा CBSE शाळेचा RTE 25% प्रवेश प्राप्त विद्यार्थ्यांच्या शेकडो पालकांची दिशाभूल करुन फी वसूलीचा गोरख धंद्याचा मोठा स्कॅम उघडकीस आला असून व इतर प्रकरणही उघडकीस येणार असून या सर्व प्रकरणाची तक्रार संबंधित शिक्षण विभागाकडे करण्यात आली आहे. शिक्षण विभाग यावर कोणती कारवाई करतील किंवा ऑल इज वेल सर्टिफिकेट तर देणार नाही ना? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिका पालकांना झापड मारण्याचे बोलतात तर शाळेचे अध्यक्ष टिसी काढण्याची धमकी देतात अशा उद्धट भाषेचा वापर करून अशोभनीय वर्तवणुक करीत असल्याने पालक वर्गा कडून तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहेत.

बातमी संकलन : गजेंद्र डोंगरे 

Previous articleचालकाला डुलकी येताच उलटली भक्तांची ट्रॅव्हल्स,थोडक्यात बचावले भक्तगण
Next articleपारशिवनी पोलिसांनी गोतस्करी करणाऱ्या तीन गाड्यावर केली कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here