Home Breaking News पारशिवनी पोलिसांनी गोतस्करी करणाऱ्या तीन गाड्यावर केली कारवाई

पारशिवनी पोलिसांनी गोतस्करी करणाऱ्या तीन गाड्यावर केली कारवाई

470
0

विशेष प्रतिनिधी :

पारशिवणी/नागपुर (Parseoni/Nagpur):- पारशिवनी पोलीस स्टेशन हद्दीतील सकरला गावाच्या परीसरातुन मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या जनावरांची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती, पारशिवनी ठाणेदार राहूल सोनवणे यांना मिळताच, या गोतस्कराना रंगेहाथ मुद्देमालासह जेरबंद करण्यासाठी खापा रोडवर, मौजा सकरला गावाच्या परिसरात पारशिवनी पोलीस स्टेशन ठाणेदार राहूल सोनवणे यांनी दिनांक 22 /05/ 2023 रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोस्टे पारशिवनी हद्दीतील पारशिवनी खापा रोडवर मौजा सक्करला गावातून तीन पिकअप वाहने जनावरांची अवैद्य वाहतूक करत असल्याची खबर मिळाल्याने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अशित कांबळे सो., रामटेक विभाग, माननीय पोलीस निरीक्षकश्री. राहुल सोनवणे सो ., ठाणेदार पोलीस स्टेशन पारशिवनी , पोउपनि शिवाजी मुंढे साहेब ,पोलीस स्टाफ पो ना टेकाम,पो शि काकडे, रुपेश राठोड व पंचांसह घटनास्थळी जाऊन 03 पिकअप वाहने अंदाजे किंमत 15 लाख रुपये व 24 जनावरे अंदाजे किंमत 3,05,000 रुपये असा एकूण 1805000/ रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला सदरची जनावरे गोशाळेमध्ये जमा केली व आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला .

पारशिवनी तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या गोधनावर डोळा ठेवून आपल्या दलालाच्या मदतीने अवैध रित्या जनावरे खरेदी करून खाजगी वाहनांने अवमानिया रित्या जणावरे कोंबुन शहरातील कत्तल खाण्यात नेऊन विक्री करणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत.

Previous articleसीबीएसई हायस्कूलचा RTE 25% चा घोटाळा, बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क हिरावला!
Next articleकृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवणी वर सभापती पदी अशोक चिखले तर उपसभापती पदी सुभाष तडस यांची बिनविरोध निवड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here