Home Crime चालकाला डुलकी येताच उलटली भक्तांची ट्रॅव्हल्स,थोडक्यात बचावले भक्तगण

चालकाला डुलकी येताच उलटली भक्तांची ट्रॅव्हल्स,थोडक्यात बचावले भक्तगण

602
0

विशेष प्रतिनिधी :

देवलापार/ नागपूर (Deolapar/Nagpur) :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील मरारवाडी जवळ ट्रॅव्हल्स चालकाला झोपेची डुलकी आल्याने ट्रॅव्हल्स रस्त्याच्या खाली उलटल्याची घटना दि.1 जून ला पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. या अपघातात मात्र कुठलीही जीवित हानी झालेली नाही.

प्राप्त माहितीनुसार, जबलपूर कडून नागपूर कडे देव दर्शनावरून येत असलेल्या ट्रॅव्हल्स क्रमांक PY 01 CU 5791 च्या चालकाला मरारवाडी परिसरात झोपेची डुलकी आल्याने चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटले.व ट्रॅव्हल्स ही रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.मात्र या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या ट्रॅव्हल्स मध्ये जवळपास 35 ते 40 यात्रेकरू असल्याचे समजले.
अपघाताची माहिती ओरिएंटल टोल प्लाझा यांना कळताच अंबुलेन्स टीम डॉ.अनिल गजभिये, गणेश बघमारे, पेट्रोलिंग टीम सिद्दीकी सर,शुभम सोमकुवर यांनी घटनास्थळी धाव घेतली, व घायल व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर येथे नेण्यात आले. त्यापैकी 5 जणांना नागपूर मेडिकल येथे रेफर करण्यात आले असून 5 जणांवर मनसर येथे प्रथमोपचार सुरू आहे.व बाकी यात्रेकरू यांना टोल प्लाझा खुमारी येथे ठेवण्यात आले आहे.

Previous articleगावातील सांडपाणी वाहून साचत असलेल्या ठिकाणी गावाचे पाणीपुरवठा विहिरीचे काम होत असल्याने काम बंद करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी
Next articleसीबीएसई हायस्कूलचा RTE 25% चा घोटाळा, बालकांचा मोफत शिक्षणाचा हक्क हिरावला!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here