Home Breaking News कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवणी वर सभापती पदी अशोक चिखले तर उपसभापती...

कृषी उत्पन्न बाजार समिती पारशिवणी वर सभापती पदी अशोक चिखले तर उपसभापती पदी सुभाष तडस यांची बिनविरोध निवड.

478
0

विशेष प्रतिनिधी :

पारशिवणी/नागपुर (Parseoni/Nagpur) :- पारशिवनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची संचालक पदाची निवडणूक २८ एप्रिल २०२३ ला पार पडली. या निवडणुकीत काँग्रेस समर्पित शेतकरी सहकार पॅनलचे १८ ही उमेदवार बहुमताने निवडून आले. त्यामुळे पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती वर केदार गटाची एक हाती सत्ता राहणार असल्याचे स्पष्ट स्पष्ट झाले.

आज पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती पदाची निवडणूक २४ मे २०२३ ला पार पडली. या निवडणुकीत बिनविरोध अशोकभाऊ बाळाजी चिखले यांची सभापती पदी तर सुभाष मुलचंद तडस यांची उपसभापती पदावर अविरोध निवड करण्यात आली.

या वेळी नवनियुक्त संचालक मंडळ उपस्थित होते. नवनियुक्त सभापती उपसभापती व संचालक, सभापती अशोकभाऊ बाळाजी चिखले, उपसभापती = सुभाष मुलचंद तडस,संचालक आत्माराम शिवाजी उकुंडे, शालीक रामराव ढोंगे, प्रकाश निलकंठ मेश्राम, सुरेश शेषराव राऊत, विठ्ठल पंजाबराव वडस्कर, सुधाकर चिंतामणराव उमाळे, सौ. सिमा भारत देशमुख, सौ. सिताबाई सुरेश भक्ते, संदीप दिलीपसिंग यादव, वैभव नारायण खोब्रागड, प्रेमचंद रामदास कुसुंबे, जिवलग चंद्रभानजी चव्हाण, सचिन आमले, दिपक वर्मा, मोहन राऊत, वासुदेव कठाने, नवनियुक्त पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उपसभापती व संचालक स्थापन करण्यात आले. यावेळी पारशिवनी कृषी उत्पन्न बाजार समिती वर केदार गटाची एक हाती सत्ता स्थापन होऊन. नवनियुक्त सभापती अशोकभाऊ बाळाजी चिखले व सुभाष मुलचंद तडस व नवनियुक्त संचालक मंडळाचे. माजी मंत्री आमदार सुनिल बाबू केदार, राजेंद्रजी मुळक, चंद्रपालजी चौकसे यांनी व दयारामजी भोयर अध्यक्ष काँगेस कमेटी पारशिवनी तालुका, श्रीधरजी झाडे महासचिव, राजुभाऊ कुसुंबे शिक्षण सभापती, प्रकाशभाऊ डोमकी, मुरलीधरजी निंबाळकर, रमेश बाबू जोध, सौ. अर्चनाताई भोयर जिल्हा परिषद सदस्या, सौ मंगलाताई उमराव निंबोने सभापती पंचायत समिती पारशिवनी, उपसभापती करूणाताई भोवते, माजी उपसभापती चेतन देशमुख, कस्तुरचंद पालीवाल अध्यक्ष नरेंद्र जिनिंग, सिवहरी भड उपाध्यक्ष नरेंद्र जिनिंग, दिपक भोयर, डुमनजी चकोले, सिध्दार्थ खोब्रागडे, विठ्ठल पंजाबराव वडस्कर, पुरुषोत्तम धोटे, रमेश वाळके, घनश्याम टिकमकर, इंद्रपाल गोरले, कमलाकर कोठेकर, दिपक वर्मा आदी कार्यकर्त्यांनी अंभिनंदन केले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्रजी मुळक व चंद्रपालजी चौकसे यांच्या कुशल मार्गदर्शनात निवडणूकीची रणनीती आखली व ती यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवुन या निवडणुकीत आपले १८ ही उमेदवार बहुमताने निवडून आणले. हिच संघटन शक्ती विधानसभा निवडणुकीत नव्या जोमाने कृती करून नवीन इतिहास घडवेल हे मात्र सत्य आहे.

Previous articleपारशिवनी पोलिसांनी गोतस्करी करणाऱ्या तीन गाड्यावर केली कारवाई
Next articleविनायकराव देशमुख हायस्कूलचे सुयश …बारावीचा निकाल १०० टक्के तर दहावीचा ८९ टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here