Home Breaking News पाटणसावंगीतील सराफा व्यापाऱ्यास दरोडेखोरांनी लुटले… लाखोंचे दागिणे व रोख मुद्देमाल दुचाकीवरिल...

पाटणसावंगीतील सराफा व्यापाऱ्यास दरोडेखोरांनी लुटले… लाखोंचे दागिणे व रोख मुद्देमाल दुचाकीवरिल बॅग घेऊन दरोडेखोर पसार

320
0

विशेष प्रतिनिधी  :

सावनेर/नागपूर (Saoner/Nagpur) :- सावनेर तालुक्यातील पाटणसावंगी येथे एका सराफा व्यापाऱ्याची दागीने व रोख रकमेसह एकुन 30 लाखाच्या मुद्देलाची बॅग घेऊन दरोडेखोर पसार झाले असल्याची घटना बुधवार 24 मे रोजी रात्री दहाच्या सुमारास घडली.
किशोर वामनराव मर्जीवे रा.पाटणसावंगी ता.सावनेर जि.नागपुर या सराफा व्यापाऱ्याचे गावातच पाटणसावंगी येथे किशोर वामनराव मर्जीवे नावाने सोन्या- चांदिच्या दागिन्याचे दुकान आहे.नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम बॅग मध्ये ठेवून दुकान बंद करण्यासाठी बॅग दुचाकीवर ठेवली. या संधीचा फायदा घेत दरोडेखोराने ती बॅग घेऊन तिथून नदिच्या दिशेने पळ काढला.दरोडे खोराचा एक साथीदार नदीच्या काठावर तर दुसरा पात्रात उभा होता.किशोर मर्जीवे यांनी आरडाओरडा करताच नागरिकांनी दरोडेखोराचा पाठलाग केला.पण दरोडेखोरांनी नागरिकांच्या दिशेने गोळीबार करून अंधाराच्या फायदा घेत पसार झाले.त्या बॅगमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 30 लाख रुपयाचा ऐवज असल्याची माहिती मर्जीवे यांनी पोलिसांना दिली.या घटनेची माहिती मिळताच सावनेर पोलीस तसेच पोलीस अधीक्षक विशाल आनंद व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे घटनास्थळी दाखल झाले.घटनेची माहिती जाणून घेऊ घटना स्थळाची पाहणी केली.पण दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले नाही.
गोळीबार केल्यानंतर तिन्ही दरोडेखोर कुसुंबी – ईटनगोटी मार्गाने अंधारात पळून गेले असावे किंवा दरोडेखोरांनी त्यांचे वाहन नदीच्या पलीकडे ठेवले असावे असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेच्या मध्यरात्रीपर्यंत पोलीस तपास सुरू होता.

बातमी संकलन : किशोर गणवीर

Previous articleहुजूर मरियम अम्मा यांचा 106 वा वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात साजरा
Next articleगावातील सांडपाणी वाहून साचत असलेल्या ठिकाणी गावाचे पाणीपुरवठा विहिरीचे काम होत असल्याने काम बंद करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here