Home Breaking News वेगात कार चालविणे भोवले, अपघातात दोघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जख्मी 

वेगात कार चालविणे भोवले, अपघातात दोघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जख्मी 

120
0

विशेष प्रतिनिधी :

कन्हान/नागपूर (Kanhan/Nagpur):– परिवारा सह कामानिमित्त दिनांक 22 मे 2023 च्या सकाळी 7 : 00 वाजता दरम्यान न्यू दिल्ली वरुन बैंगलोर कड़े जाण्याकरिता कार क्रमांक केए 04 एनसी 0042 ने निघाले असता कारचालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली कार लोखंडी रेलिंगवर आदळली . ज्यात कार मधील दोंघाचा मृत्यु झाला तर दोघे ग़म्भीर जख्मी झाले . सदर अपघात कन्हान पोलीस स्टेशन हद्दित न्यु हायवे ढाब्याच्या समोर जबलपुर – नागपुर नैशनल हायवे वर सोमवार ( 22 मे ) च्या पहाटे 7 वाजता दरम्यान घडला.

परवेज कुर्शीद अंसारी ( वय 36 ) व आफ़ीफ़ा परवेज अंसारी ( वय 12 ) असे मृतकांचे तर अमराह परवेज अंसारी ( वय 33 ) व कारचालक नदीम नईस अंसारी ( वय 28 ) असे जख्मीचे नाव आहे . चौघे रा. सिहारा ठाणा सिहारा ता. दामपुर जि. बिजनेर ( उत्तर प्रदेश ) चे रहवाशी असून कारचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Previous articleआदित्य ठाकरे शहरात येण्या भावी मुख्यमंत्री च्या बॅनर ने चर्चे पे चर्चा, भावी मुख्यमंत्री करिता जरा हटके विचार आवश्यक!
Next articleहुजूर मरियम अम्मा यांचा 106 वा वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here