Home Breaking News आदित्य ठाकरे शहरात येण्या भावी मुख्यमंत्री च्या बॅनर ने चर्चे पे चर्चा,...

आदित्य ठाकरे शहरात येण्या भावी मुख्यमंत्री च्या बॅनर ने चर्चे पे चर्चा, भावी मुख्यमंत्री करिता जरा हटके विचार आवश्यक!

125
0

विशेष प्रतिनिधी :
कन्हान/नागपूर (Kanhan/Nagpur) :–  भाजप विरुद्ध महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या पक्षातील घडा-मोडी बघता राज्यातील राजकारण दिवसेंदिवस तापतांना दिसते आहे. त्यातच पक्ष व चिंन्हाच्या वादातून दोन गुटात विभाजलेली शिवसेना, विरोधात असलेल्या आमदाराला पराजित करण्यासाठी पूर्ण जोर लावीत आहे, म्हणून जनतेचा कौल आणि सहानुभूती कुणाच्या पदरात पडेल हे समोरील निवडणुकीत नक्की स्पष्ट होईल.

तर या राजकीत तणावपूर्व वातावरणात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रामटेक विधानसभा क्षेत्रात, नागपूरात आगमना पूर्वी आदित्य ठाकरे यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लावला असल्याने विविध चर्चा रंगली, भावी मुख्यमंत्री बनन्याकरिता भावी आमदारांची फौज तैयार करावे लागणार. या करिता रामटेक क्षेत्रातील आमदार जयस्वाल विरोधात ठाकरे गटाचा नेमका उमीदवार कोण हा प्रश्न अनेकांना पडत आहे. या मागचे कारण म्हणजे निवडणुकीचा तोंडावर वेळो वेळी शुरु होणारी पार्सल नको, स्थानिक उमीदवार हवा चा कौल. सदर कारणावरून काँग्रेस चे दिग्गज माजी मंत्रीला मागील निवडणुकीत क्षेत्रात प्रचार करूनही पाय मागे घ्यावे लागले होते. पुनरावृत्ती म्हणून ठाकरे गटाने एका व्यपाराला पार्शल स्वरूपात प्रचाराच्या कामी लाविण्यात आले आहे. भावी मुख्यमंत्रीचे बॅनर लावून पक्षा प्रति एकनिष्ठ प्रेम दर्शविणे हा एक भाग असला तरी, दुसरी कडे भावी आमदारांना आर्थिक लालसे पोटी काही पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देऊन प्रचाराची सुरुवात केली आहे, हे नेते स्थानिक निष्ठावाण कार्यकर्त्यांना स्वीकारण्यात कठीण जातं आहे. ज्या मुडे दोन पक्षात विभाजलेली शिवसेना आता गटा-गटात विभाजली आहे. रामटेकात स्वता मांडी घालून बसलेले आमदार जैस्वाल व पारशीवणी व कन्हान तील दोन नगराध्यक्षा सहित अनेक नगरसेवक, पाठीशी असतांना आमदार जैस्वाल यांना पराभव करण्याचे स्वप्न बघणाऱ्या ठाकरे गटाला जरा हट के सोचून ‘प्रहार’ करावा लागणार अन्यथा मतांचे विभाजन आणि जयस्वाल यांचा विजय निश्चिचत आहे.

बातमी संकलन : विवेक पाटील 

Previous articleनागपूर येथील 25 वर्षीय तरुणाची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या, आठवड्यातील खिंडसी येथील आत्महत्या केल्याची दुसरी घटना
Next articleवेगात कार चालविणे भोवले, अपघातात दोघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जख्मी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here