Home Breaking News हुजूर मरियम अम्मा यांचा 106 वा वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात साजरा

हुजूर मरियम अम्मा यांचा 106 वा वार्षिक उर्स मोठ्या उत्साहात साजरा

34
0

विशेष प्रतिनिधी :

कन्हान/नागपूर (Kanhan /Nagpur):- हुजूर मरियम अम्मा साहेबा ( र अ ) जूनी कामठी ता. पारशिवनी येथील 106 वा वार्षिक निमित्त तीन दिवसीय आयोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहात उर्स साजरा करण्यात आला . हुजूर अम्मा साहेबा ट्रस्ट , ताजाबाद ट्रस्ट , ताजाबाद खुद्दाम ट्रस्ट , फ़ैज़आने ताजुल औलिया कमिटी , वाकी दरबार ट्रस्ट , पागलख़ाना दरबार ट्रस्ट, काबुल कंधार दरबार ट्रस्टच्या प्रमुख उपस्थितित समस्त कार्यक्रम पार पडला

हुजूर मरियम अम्मा साहेबा उर्स निमित्त तीन दिवसीय कार्यक्रमात बुधवारला ( 17 मे ) मिलाद शरीफ , गुरुवार ( 18 मे ) अम्मा दर्गा व ताजबाग शाही संदल कन्हान शहराच्या प्रमुख मार्गावरुन भृमण करत हुजूर अम्मा दर्गा गाड़ेघाट येथे पोहचला . शाही संदलमध्ये अश्व पथक , बैंड ढोल पथक व विविध सजावट आकर्षणाचे केंद्र होते . सायंकाळी 6 : 00 वाजता परचम कुशाई नंतर अम्मा दर्गाचे सज्जादानशीन ताजी तब्रेजुद्दीन , सज्जादानशीन ताजी तनवीरूद्दीन व ताजी मुस्तफीजुद्दीन यांच्या प्रमुख उपस्थितीत चादर पेश करण्यात आली तसेच रात्रि कव्वालीचा कार्यक्रमात सुप्रसिध्द कव्वाल यांनी सादरीकरण केले तर शुक्रवारला कुल शरीफने उर्स समापन झाले.

यावेळी माजी मंत्री राजेंद्र मुळक , नरेश बर्वे , वर्धराज पिल्ले , चंद्रशेखर भिमटे , उदयसिंग उर्फ गज्जू यादव , रिता बर्वे , नगरसेवक मनीष भिवगड़े , रिंकेश चवरे आदिनी शाहीसंदल मध्ये हजेरी लावली होती शिवाय कन्हान येथील प्रमुख मार्गावर विविध ठिकाणी संदलचे स्वागत करण्यात आले व शरबत , मिष्ठान व पानी वितरण करण्यात आले होते.

कन्हान पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर , सहायक पोलीस निरिक्षक दिलीप पोटभरे व खुफिया विभागाचे आतिश मानवटकर सह इतर पोलीस कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले असून ट्रस्टच्या पदाधिकारी व सदस्यांनी कार्यक्रम सफलार्थ प्रयत्न केले व उर्सच्या तीन दिवसीय कार्यक्रमात हजारोच्या संख्येत भाविक उपस्थित होते.

बातमी संकलन  : विवेक पाटील 

Previous articleवेगात कार चालविणे भोवले, अपघातात दोघांचा मृत्यु तर दोघे गंभीर जख्मी 
Next articleपाटणसावंगीतील सराफा व्यापाऱ्यास दरोडेखोरांनी लुटले… लाखोंचे दागिणे व रोख मुद्देमाल दुचाकीवरिल बॅग घेऊन दरोडेखोर पसार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here