Home Breaking News नागपूर येथील 25 वर्षीय तरुणाची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या, आठवड्यातील खिंडसी...

नागपूर येथील 25 वर्षीय तरुणाची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या, आठवड्यातील खिंडसी येथील आत्महत्या केल्याची दुसरी घटना

146
0

विशेष प्रतिनिधी :

रामटेक /नागपूर (Ramtek/Nagpur) :-  रामटेक येथे उप्पलवाडी नागपूर येथील 25 वर्षीय तरुणाने शनिवार ला रामटेक येथील खिंडसी जलाशयात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार,उप्पलवाडी, नागपूर येथील 25 वर्षीय तरुण नामे अक्षय राजीव लोहकरे हा नागपूर वरून आपल्या दुचाकी क्रमांक एम.एच.31 इ.सी.2322 हिने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने रामटेक येथे आला. व संधी साधून त्याने खिंडसी जलाशयात उडी घेतली. दुसऱ्या दिवशी रविवार ला सकाळी अक्षयचा मृतदेह पाण्यावर तरंगताना लोकांना दिसून आला. व घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस नायक प्रफुल रंधई, मंगेश सोनटक्के, पोलीस शिपाही शरद गीते, नितेश डोकरीमारे यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेले. आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा तपास रामटेक पोलीस करीत आहेत.

सदर तरुणाच्या खिंडसी जलाशयात आत्महत्या करण्याची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. याआधी रामटेक येथील शनिवारी वॉर्ड येथील तरुणाने आत्महत्या केल्याची घटना या ठिकाणी घडली आहे. तेही आत्महत्या करण्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. यामुळे पालकांनी आपल्या मुलांना किशोरवयात मुलांचे समुपदेशन करणे त्यांच्या रोजच्या हालचाली कडे लक्ष ठेवणे गरजेचे झाले आहे. आत्महत्या करणे हा तरुण साठी अडचणीतून निघण्याच्या मार्ग नाहीच तर त्यावर तोडगा देणे अडचणींना मात करणे याबद्दल मार्ग काढणे महत्वाचे आहे. त्यामुळे पालकांनी वेळेत आपल्या पाल्यांच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न ऐकून घेणे व त्यावर त्यांच्याशी विचार विमर्श करणे गरजेचे आहे. तर वेळ पडल्यास मुलांना एखाद्या समुपदेशन केंद्रात नेऊन त्यांचे समुपदेशन करणे ही गरजेचे आहे. असे तज्ञांचे मत आहे.

 

Previous articleसर्पदंशाने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, एकाच परिसरातील एकाच आठवड्यातील सर्पदंशाने मृत्यूची दुसरी घटना
Next articleआदित्य ठाकरे शहरात येण्या भावी मुख्यमंत्री च्या बॅनर ने चर्चे पे चर्चा, भावी मुख्यमंत्री करिता जरा हटके विचार आवश्यक!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here