Home Breaking News उपमुख्यमंत्र्याची आढावा बैठक..”जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा.. “फडणवीस यांनी दिल्या सूचना…. विकास...

उपमुख्यमंत्र्याची आढावा बैठक..”जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा.. “फडणवीस यांनी दिल्या सूचना…. विकास कामांच्या घेतला आढावा

163
0
 • विशेष प्रतिनिधी 
  सावनेर/नागपूर (Saoner/Nagpur):– शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आणि योजनांना गती देण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यापर्यंत पोहोचवा अशा सूचना मुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील सावनेर तहसील कार्यालयातील परिसरात आढावा बैठकीदरम्यान दिल्या.
  उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी सावनेर येथील तहसील कार्यालयात सावनेर विधानसभेतील सावनेर व कळमेश्वर तालुक्याची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सावनेर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी सावनेर व कळमेश्वर तालुक्या अंतर्गत जलयुक्त शिवार योजना, शासकीय वसुली , अमृत सरोवर योजना, ई ऑफिस प्रणाली, वाळू व इतर गौण खनिज, प्रधानमंत्री किसान योजना, घरकुल योजना, कृषी विभाग, संजय गांधी निराधार योजना, वन हक्क कायदा 2006, ग्राम तेथे स्मशानभूमी, किसान विमा योजना, कोतवाल, पोलीस पाटील भरती, अन्नपुरवठा योजना, पाणीटंचाई आदि सुरू असलेले व पूर्ण झालेल्या कामांची माहिती दिली.
  यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्यात संपूर्ण सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.व सावनेर विधानसभेतील सुरू असलेल्या विकास कामांचे कौतुक केले.शासनाच्या घरकुल योजना, कृषी सौर योजना, किसान विमा योजना आदि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही दिली.
  याप्रसंगी बैठकीला रामटेक मतदार संघाचे खासदार कृपाल तुमाने, सावनेरचे आमदार तथा माजी मंत्री सुनील केदार, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटनकर, जिल्हा परिषद मुख्याधिकारी सौम्या शर्मा, नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सावनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिपक गरूड तसेच सावनेर व कळमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती, नगरपरिषद, व सर्व शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
  कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी केले तर आभार सावनेर तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नायब तहसीलदार विजय कोहळे, संदिप डाबेराव, संजय अनवाजे, मंडळ अधिकारी राजेश वखारे, शरद नांदुरकर, गणेश मोरे, अनिल भोसले आदींनी परिश्रम घेतले.
  बातमी संकलन : किशोर गणवीर
Previous articleभारत विकास परिषदेची संकल्प कार्यशाळा संपन्न…भाविपचे १२ स्थायी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय
Next articleसर्पदंशाने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, एकाच परिसरातील एकाच आठवड्यातील सर्पदंशाने मृत्यूची दुसरी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here