Home Breaking News सर्पदंशाने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, एकाच परिसरातील एकाच आठवड्यातील सर्पदंशाने मृत्यूची दुसरी...

सर्पदंशाने १४ वर्षीय मुलीचा मृत्यू, एकाच परिसरातील एकाच आठवड्यातील सर्पदंशाने मृत्यूची दुसरी घटना

164
0

विशेष प्रतिनिधी :

देवलापार/नागपूर (Deolapar/Nagpur) : येथुन जवळच असलेल्या करवाही येथिल विद्यार्थिनी कु खुशबू रामदास मांढरे वय १४ रा करवाही हिचा सर्पदंशाने मृत्यु झाला ही घटना शुक्रवारच्या रात्री ३ ते ४ चे दरम्यान घडली.त्यामुळे गावात शोककळा पसरली. याबाबत माहिती अशी की ज्ञानदीप विद्यामंदीर करवाही येथिल विद्यार्थीनी कुमारी खुशबू रामदास मांढरे वर्ग ८ वा (७ वी पास) ही रात्री (शुक्रवार) कुटुंबियांसोबत झोपली होती. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व कुटुंबिय कुलर लावून जमीनिवरच झोपले. घराचे मागचे बाजूला शेती आहे, त्यामुळे सरपटणारे विषारी साप थंड वातावरण असल्याने तेथे आला असावा. त्यात तो अंथरुणात शिरला व खुशबूच्या बाजुलाच होता तिने झोपीत कळ पलटल्याने त्याला धक्का लागल्याने त्याने तिचे पाठीला चावा घेतला, त्यानंतर त्याने तिचे हाताच्या बोटाला चावला.त्यानंतर काही चावल्याची चाहुल लागताच तिने ही बाब तिचे आई वडिलांना सांगीतली वडीलांनी काही गावठी उपचार करुन तिला लगेच देवलापारच्या ग्रामिण रुग्णालात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.आज दुपारी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.

या परिसरातील ही या आठवड्यातील दुसरी घटना असून पहिली घटना ही सर्पदंशाने च हॉस्पिटल ला न जाता गावातीलच गावठी औषधी च्या सेवन करून लवकर बरे होईल या अंधश्रद्धेने झाली तर ही दुसरी घटना आहे. त्यामुळे परिसरात वनविभाग कडून आदिवासी बहुल भाग असल्याने सर्पदंश, वन्यप्राणी आणि काळजी या विषयावर प्रचार प्रसार आणि अंधश्रद्धा निर्मुलनची मोठ्ठ्या प्रमाणात आवश्यकता असल्याचे आढलून येत आहे. त्यामुळे वन विभागाने शक्यतोवर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर नागरिकांना सतर्क करण्याची आणि वेळेत वैद्यकीय उपचार घेत येईल या विषयी जनजागृती करणे गरजेचे आहे.

Previous articleउपमुख्यमंत्र्याची आढावा बैठक..”जनसामान्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवा.. “फडणवीस यांनी दिल्या सूचना…. विकास कामांच्या घेतला आढावा
Next articleनागपूर येथील 25 वर्षीय तरुणाची खिंडसी तलावात उडी घेऊन आत्महत्या, आठवड्यातील खिंडसी येथील आत्महत्या केल्याची दुसरी घटना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here