Home Crime कुस्तीपटूंच्या समर्थनात एस.एफ.आय.-डी.वाय.एफ.आय.-एडवा चे रामटेक येथे धरणा प्रदर्शन

कुस्तीपटूंच्या समर्थनात एस.एफ.आय.-डी.वाय.एफ.आय.-एडवा चे रामटेक येथे धरणा प्रदर्शन

88
0

विशेष प्रतिनिधी :

नागपूर/रामटेक (Nagpur/Ramtek) :- रामटेक येथे स्टुडंन्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया , डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया, जनवादी महिला संघटना व शेतमजूर युनियन च्या वतीने दिल्लीतील जंतर मंतर येथे लैगिंक शोषणाचा निषेधार्थ धरणावर बसलेल्या कुस्तीपटूंच्या समर्थनात सांयकाळी 5 : 30 वाजता ते 7 वाजता पर्यंत धरणा प्रदर्शन करण्यात आले. 18 मे रोजी देशव्यापी विरोध दिवसाच्या अंतर्गत हे धरणे आंदोलन करण्यात आले. यात कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष व भाजपा खासदार बृजभूषण सिंग व हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांना अटक करा, महिलांच्या लैगिक शोषणावर व अत्याचारावर आळा घाला आदी प्रमुख मागण्या होत्या. जगात भारताच नाव उंचावणारे कुस्तीचे खेळाडू गेल्या 25 दिवसापासून आंदोलन करता आहेत पण आतापर्यंत कुठल्याच आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही. आरोपी भाजपशी सबंधित असल्याने उलट सरकराने त्यांना राजकीय सरंक्षण दिले, त्यांना पाठीशी घातले आहे अशी शोकांतिका डी.वाय.एफ. आय. चे जिल्हा अध्यक्ष अमित हटवार यांनी यावेळी व्यक्त केली. धरण्यात एस.एफ.आय चे अध्यक्ष संदेश रामटेके, धनंजय सलामे, संघर्ष हटवार,उमेश तुमडाम, राम ,जनवादी महिला संघटनेच्या कल्पना हटवार, गौराबाई माकडे,अपर्णा वासनिक, कल्पना गोंडाने,कविता मरहसकोल्हे, शेतमजूर यूनियन चे जिल्हाध्यक्ष भीमराव गोंडाने, राजू हटवार, टेकचंद चांपुरकर,राजू नेवारे, गौतम नाईक, भाऊराव सहारे,भागवत सहारे,नितीन कुंटे,बाळकृष्ण नारनवरे सहित इतरांनी सहभाग घेतला.

Previous articleपालोरा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केली २० वर्षे पुराण्या हिरव्या गर्द झाडाची अमानुषपणे कत्तल, ठराव फांद्या तोडण्याचा,तोडले झाडे.
Next articleभारत विकास परिषदेची संकल्प कार्यशाळा संपन्न…भाविपचे १२ स्थायी प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here