Home Breaking News नयकुंड येथील प्रवासी निवारा झाला शोपीस, लग्न सराई मध्ये बाहेर गावी जाणाऱ्यांना...

नयकुंड येथील प्रवासी निवारा झाला शोपीस, लग्न सराई मध्ये बाहेर गावी जाणाऱ्यांना घ्यावा लागतो पानटपरी सहारा

93
0

विशेष प्रतिनिधी

पारशिवनी :- बसेसची वाट पाहताना ऊन, पाऊस, वारा यापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाने प्रत्येक गावात प्रवासी शेड/निवारे बांधले आहेत. मात्र बहुतांश गावातील प्रवासी शेडची दयनीय अवस्था असल्याने ते केवळ शोपीस बनले आहेत. त्याचबरोबर काही प्रवासी शेडचे फक्त शेडच गायब असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी बसायला जागा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवासी शेडमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी सिमेंटचे शेड तयार करण्यात आले होते, मात्र या सिमेंटच्या शेडची तोडफोड करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी प्रवासी शेड नावालाच आहेत. रस्त्यावर उभे असताना हे करा. आमडी ते पारशिवनी रस्त्यावर वसलेल्या नायकुंड गावच्या बसस्थानकाचे छत गायब असल्याने प्रवाशांना भर पावसात,उन्हात रस्त्यावरच लपून बसची वाट पहावी लागत आहे, तर या लग्न सराई च्या सिजन मध्ये नागरिक लग्ना निमित्त बाहेर गावी येजा करीत असतात अशातच अनेकांना शेडच्या अभावी पानटपरी अशा ठिकाणचा सहारा घ्यावा लागतो आहे. मात्र प्रशासन व संबंधित विभागाचे अधिकारी पाहूनही गप्पच आहेत.  पॅसेंजर शेडचे बांधकाम, त्याची निगा व दुरुस्ती शासनाकडून होत नसल्याने प्रवासी शेडची अवस्था दयनीय झाली आहे. सध्या जिथे प्रवासी शेड आहे, त्या शेडच्या भिंती कोसळल्या आहेत. अनेक छत गायब झाल्या आहेत. काही ठिकाणी फक्त भिंती उभ्या आहेत. त्यामुळे ऊन, वारा, पावसापासून प्रवाशांचे संरक्षण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत. प्रवासी शेडच्या दयनीय अवस्थेमुळे प्रवाशांना रस्त्यावर प्रवासी शेडजवळ छोट्या दुकानात किंवा झाडाखाली थांबून बसची वाट पहावी लागते. वरील समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागाने प्रवासी शेड बसेसच्या दुरुस्तीची प्रतीक्षा : प्रवासी शेडची दुरुस्ती करण्याची मागणी पारशिवनी वासीयांकडून केली जात आहे.

Previous articleआदिवासी भागात अंधश्रद्धेमुळे सर्पदंशाने गेला महिलेचा जीव
Next articleसरकारचा निर्णय 2000 रुपयाची नोट होणार 23 मे 2023 पासून बंद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here