Home Crime ट्रक – कारचा अपघातात एक गंभीर तर दोन जखमी 

ट्रक – कारचा अपघातात एक गंभीर तर दोन जखमी 

141
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक – रामटेक शहरातील राखी तलाव जवळील बायपास जवळ ट्रक आणि कार च्या धडकेत एक व्यक्ती गंभीर तर दोन जखमी झाले. सविस्तर माहिती अशी की गोंदिया कडून जाणारी स्विफ्ट कार क्रमांक MH 35 AR 6947 क्रमांकाची गाडी राखी तलाव बायपास जवळ समोर कोळसा भरून येणारा ट्रक क्रमांक MH 40 BL 9369 याची जबरदस्त आमोरासमोर धडक झाली. यातील कार चालक अंदाजे वय २७ वर्ष गंभीर स्वरूपात जखमी झाला. त्याला नागपूर येथे रेफर करण्यात आले, तर एक युवक वय २६ वर्ष व एक तरुणी वय जवळपास २२ वर्ष जखमी झालेे. तरुणीची पायाला गंभीर मार लागला आहे, धडक इतकी जबरदस्त होती की  कारचा समोरील भाग पूर्ण क्षतिग्रस्त झाला होताा. सर्व राहणारे सिव्हिल इं गोंदिया येथील असल्याचे कळते तरूणीने आपले नाव विशू मडावी असल्याचे सांगितले सविस्तर उत्तर देईपर्यंत पोलिसांच्या तपास सुरू आहे. जखमी आपले नाव सांगण्यास टाळाटाळ करीत आहे पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.

Previous article१७ वर्षीय युवकाची खिंडसि तलावात उडी घेऊन आत्महत्या
Next articleपिण्याच्या पाण्यासाठी 300कि.मी. चालून आलेल्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी पाठविले परत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here