Home Breaking News आदिवासी भागात अंधश्रद्धेमुळे सर्पदंशाने गेला महिलेचा जीव

आदिवासी भागात अंधश्रद्धेमुळे सर्पदंशाने गेला महिलेचा जीव

96
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक/देवलापार :- अंधश्रद्धेमुळे अनेकांचे जीव गेलेत अशा अनेक बातम्या आपण वृत्तपत्रात वाचतो.आजच्या या विज्ञान युगात अंधश्रद्धा पाडणारे बरेच कमी लोकं दिसून येतात.तरी मात्र आदिवासी भागात अंधश्रद्धा अजूनही दिसत आहे.असाच एक प्रकार देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावरा या आदिवासीबहुल गावात घडली.

तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेला सापाने चावा घेतला मात्र अंधश्रद्धेच्या अभावी येऊन नातेवाईकांनी जडिबुटी तांत्रिकाकडे प्रथमोपचारासाठी घेऊन गेल्याने त्या महिलेचा जीव गेला.ही घटना दि.18 मे ला सकाळी 8 वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार, सावरा या आदिवासी गावातील महिला संगीता उमेश टेकाम वय 40 वर्ष, ह्या नेहमीप्रमाणे तेंदूपत्ता गोळा करायला जंगलात गेल्या होत्या. तेंदूपत्ता गोळा करत असतांना अचानक त्यांच्या पायाला विषारी सापाने चावा घेतला. यामुळे त्या बेशुद्ध झाल्या. बेशुद्ध अवस्थेत घरी आणून सर्पदंश झालेल्या महिलेला दवाखान्यात न घेऊन जाता गावाजवळील गावठी उपचार करण्यासाठी जडिबुटी तांत्रिकाकडे घेऊन गेलेत. त्यांनी थातुरमातुर उपचार करून परत पाठवले. घरी आल्यानंतर त्यांच्या पोटात दुखू लागले. काही वेळाने सायंकाळच्या वेळी त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांच्या व जडिबुटी तांत्रिकाच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेला. जर त्यांना वेळेतच दवाखान्यात नेले असते तर आज त्या महिलेचे प्राण वाचले असते.

घटनेची माहिती देवलापार पोलिसांना देण्यात आली. मृतकाला शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देवलापार येथे नेण्यात आले.शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

आदिवासी भागातील लोकांनी सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धेला बळी न पडता तांत्रिकाकडे न घेऊन जाता सरळ दवाखान्यात न्यावे अशी माहिती वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन प्राणीमित्र सर्पमित्र राहुल कोठेकर,अजय मेहरकुडे यांनी ग्रामस्थांना दिली.

Previous articleरामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखे कडून पर्दाफाश
Next articleनयकुंड येथील प्रवासी निवारा झाला शोपीस, लग्न सराई मध्ये बाहेर गावी जाणाऱ्यांना घ्यावा लागतो पानटपरी सहारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here