Home Breaking News रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखे कडून पर्दाफाश

रामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखे कडून पर्दाफाश

167
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक – दिनांक ०३/०४/२०२३ रोजी फिर्यादी नामे शुभम वासुदेव मोहनकर, वय २७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ कारवाही ता. रामटेक जि. नागपुर हे त्यांचे होणान्या पत्नी सह रामटेक गडमंदीर परिसरात मोटर सायकलने फिरायला गेले होते. गडमंदीर ते अंबाडा कडे जाणाऱ्या रोड वर ते दोघेही एका ठिकाणी थांबले असतांना एका होन्डा शाईन मोटर सायकलवर आलेल्या तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे होणाऱ्या पत्नीस शिवीगाळ करून मारण्याचे धमकी देवुन जबरीने नगदी पैशांसह इतर साहीत्य जबरीने हिसकावुन नेल्याचे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे रामटेक येथे अप. क्र. १४२ / २३ कलम ३९२, ५०४, ५०६, ३४ भादवि. अन्वये गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. सदर घटने पासुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हयाचा समांतर तपास करीत होते.

आज दिनांक ११/०५/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास गुप्त बातमी प्राप्त झाली की, सदर गुन्हयातील फिर्यादी यांनी अनोळखी आरोपी बाबत सांगीतलेल्या वर्णना सारखा इसम हा लाल काळया रंगाचे चेक्स चे शर्ट घातलेला होन्डा शाईन मोटर सायकलने पोलीस ठाणे कन्हान परिसरात फिरत आहे. अशा माहीती वरून पथकाने सापळा रचुन इसम नामे प्रमोद राजेंद्र सहानी, वय २३ वर्ष, रा. क्वार्टर क्र. ५१४, खदान क्र. ३, कन्हान जि. नागपुर यास थांबविले असता विचारपुस दरम्यान त्याने त्याचे साथीदार १) विक्की निशाद, रा. खदान क्र. ३ कन्हान व २) संतोष रा. इलाहबाद यांचे सह सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगीतले. मिळुन आलेल्या आरोपीचे ताब्यातुन सदर गुन्हयातील जबरीने हिसकावुन नेलेला एक हिरव्या रंगाचा रियलमी कंपनिचा अॅन्ड्रॉईड मोबाईल किंमती ४,०००/- रू. नगदी २,०००/-रू व सदर गुन्हा करते वेळी वापरलेली एक काळा रंगाची लाल पट्टे असलेली होन्डा शाईन मोटर सायकल क्र. एम. एच. – ४० – ए.ए.- ४५२८ किंमती ६०,००० /- रू. असा एकुण ६६,००० /- रू चा मुद्देमाल जप्ती पंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी नामे प्रमोद राजेंद्र सहानी याचे वर यापुर्वी जबरी चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीस जप्त मुद्देमालासह पोलीस ठाणे रामटेक यांचे ताब्यात दिले असुन पुढील तपास पोलीस ठाणे रामटेक करीत आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. विशाल आनंद, भा.पो.से. अपर पोलीस अधीक्षक डॉ. श्री. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. ओमप्रकाश कोकाटे, पोलीस सपोनि राजीव कर्मलवार, हवालदार गजेंद्र चौधरी, रोशन काळे नापोशि विपीन गायधने, रोहन डाखोरे, चालक अमोल कुथे तसेच सायबर सेलचे सतिष राठोड यांचे पथकाने केली.

Previous articleपिण्याच्या पाण्यासाठी 300कि.मी. चालून आलेल्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी पाठविले परत.
Next articleआदिवासी भागात अंधश्रद्धेमुळे सर्पदंशाने गेला महिलेचा जीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here