Home Breaking News पिण्याच्या पाण्यासाठी 300कि.मी. चालून आलेल्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी पाठविले परत.

पिण्याच्या पाण्यासाठी 300कि.मी. चालून आलेल्या संघर्ष यात्रेला पोलिसांनी पाठविले परत.

40
0

विशेष प्रतिनिधी बाजारगाव:  अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ६९ गावांतील गावकऱ्यांना खारे पाणी पिण्याची वेळ आहे. गोड पाणी देऊन शासनाने दिलासा द्यावा, अशी आंदोलकांची मागणीला जोर धरत होता. १० एप्रिलला संघर्षयात्रेचा प्रवास सुरू झाला. २१ एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जावून आमचा प्रश्न मांडून मागण्या पदरात पाडून घेऊ अशा आशेने ३०० कीमी पदयात्रा काढून उपराजधानी नागपूर वेशीवर धामना येथे १९ एप्रिलला धडकली असता, पोलीसांनी संघर्ष यात्रेला मज्जाव देत रात्रभर थांबवून, सकाळी दहा ट्रॕव्हल्सने त्यांना विरोध करुन अकोला येथे परत पाठविण्यात आले. बाळापुर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोल्यापासून नागपूरपर्यंत पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली. गुरुवार २० एप्रील रोजी सकाळी आठ वाजता ही संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर धडकली. मोर्चेकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार होते. त्यामुळे नागपूरच्या वेशीवरच धामना येथे पोलिसांचा मोठा बंदोस्त ठेवण्यात आला होता. तसेच दत्तवाडी परिसरातही पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात आली होती.

#आमदार देशमुखसह संघर्ष यात्रेचा ताफा ताब्यात घेऊन.. दहा ट्रॕव्हल्समध्ये बसवून त्यांना अकोला येथे परत रवाना.

संघर्ष यात्रा नागपूरच्या वेशीवर येताच पोलिसांनी आंदोलकांना वेशीवरच अडवलं. त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. फडणवीस यांच्या घरापर्यंत जाण्याची आंदोलकांनी परवानगी मागितली होती. पोलिसांनी ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे आंदोलक आणखीनच भडकले. आंदोलकांनी नागपूरच्या वेशीवर रस्त्यावरच बसून जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमदार देशमुखसह शेकडो यात्रेकरू जमिनीवर झोपले. मात्र, काही पोलिसांनी आमदार देशमुख यांचे हात तर काहींनी पाय पकडून त्यांचेसह सातशे नागरिकांना दहा ट्रॕव्हल्स बसमध्ये अक्षरश: उचलून नेले.

# संघर्षयात्रेच्या ३०० कीमी प्रवासाला नाकाबंदी, पिण्याच्या पाण्याचा संघर्षाला न्याय मिळेल काय?

संघर्ष यात्रेचा ताफा पोलिसांच्या कडक बंदोबस्तात अकोला येथे रवाना.

संघर्ष यात्रा ४० डिग्री सेल्सिअस उन्हात डांबरी महामार्गावरील पायपीट अन् रोज जिवाची काहिली फोडत ३०० किमीचा प्रवास अकोला ते नागपूर असा दहा ठिकाणी मुक्काम करीत सातशे गावकऱ्यांचा ताफा धामना लिंगा परिसरात १९ एप्रिलला दाखल झाला. खारपाणपट्ट्याचे भोग संपून गोड व शुद्ध पाणी प्यायला मिळावे म्हणून ही संघर्षयात्रा उपराजधानीच्या वेशीवर पोलीसांनी थांबवली. अन् गुरुवारी सकाळी दहा ट्रॕव्हल्स बसनी अकोला येथे रवाना केले.

बातमी संकलन : गजेंद्र डोंगरे

Previous articleट्रक – कारचा अपघातात एक गंभीर तर दोन जखमी 
Next articleरामटेक गडमंदीर परिसरात जोडप्यास लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखे कडून पर्दाफाश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here