Home Breaking News १७ वर्षीय युवकाची खिंडसि तलावात उडी घेऊन आत्महत्या

१७ वर्षीय युवकाची खिंडसि तलावात उडी घेऊन आत्महत्या

159
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक – शनिवारी वॉर्ड येथील युवकाची तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. सविस्तर वृत्त असे की रामटेक शहरातील शनिवारी वॉर्ड येथील रोहित रतन कोडपे, वय १७ वर्ष हा दिनांक १७ मे २०२३ ला सकाळपासून बेपत्ता होता, परिवारातील सर्व व्यक्तींनी शोधाशोध सुरू केले, परंतु सापडला नाही, शेवटी रोहन चा कुटुंबीयांनी रामटेक पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली , सायंकाळी सूचना मिळाली की खींडसी तलावात कोणीतरी उडी. मारली , पोलिसांनी शोध घेतला असता किनाऱ्यावर रोहित चे जोडे सापडले परंतु अंधार झाल्यामुळे शोध कार्य करता आले नाही . दुसऱ्या दिवशी १८ मे २०२३ गुरुवार ला त्याचे मृतदेह खिंडसी तलावात तरंगताना दिसले लगेच स्थानिक लोकांनी पोलिसांना पाचारण केले. पोलीस उशिरा घटनास्थळ गाठून गोटाखोराच्या साहाय्याने तलावा बाहेर काढून प्रेत पोलिसांनी ताब्यात घेऊन उतरणीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आले . आत्महत्या करण्या मागचे कारण अद्याप अज्ञात आहे , अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हडकंप माजला आहे. पुढील कार्यवाही रामटेक पोलीस करीत आहे.

Previous articleलाल परीच्या कमतरतेमुळे प्रवासी रडकुंडीस, लग्न सराईमुळे प्रवाशांचे बेहाल
Next articleट्रक – कारचा अपघातात एक गंभीर तर दोन जखमी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here