Home Breaking News लाल परीच्या कमतरतेमुळे प्रवासी रडकुंडीस, लग्न सराईमुळे प्रवाशांचे बेहाल

लाल परीच्या कमतरतेमुळे प्रवासी रडकुंडीस, लग्न सराईमुळे प्रवाशांचे बेहाल

98
0

विशेष प्रतिनिधी :

रामटेक – तालुका प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ तर्फे रामटेक बसस्थानकारावरून सुरू असलेल्या बस फेरीची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

रामटेक बस स्थानकावरून नियमित १९३ ट्रिप गाडी लागत असते त्यात १४९८१ किलोमीटर नियमित अंतर कापत असतात रामटेक बस आगारात एकूण ५० बस असून त्यातली एक स्क्रॅप मध्ये तर तीन बसेस दुरुस्ती करता उभी आहे त्यातील एकूण ४६ बसेस रामटेक तालुक्यात व विविध भागात धावत असतात रामटेक तालुका आदिवासी बहुल भाग असल्यामुळे लोकांना व विद्यार्थ्यांना आपले काम आटोण्याकरता नियमित नागपूरला धावपळ करावी लागते त्यामुळे नागपूर मार्गावर प्रवाशांचा मोठी गर्दी असते तसेच इतर मोठ्या शहराला निघायचे असेल तर मोठा स्टेशन नागपूर पडतो त्यामुळे रामटेक- नागपूर गाड्यावर लोकांची मोठी गर्दी असते परंतु या मार्गावर नियमित वेळेवर गाडी सुटत नसल्यामुळे व फेऱ्या कमी असल्यामुळे लोकांना गर्दीचा त्रास सहन करावा लागतो इच्छा नसतानाही एकाच गाडीमध्ये ५५ ची क्षमता असलेल्या गाडीमध्ये १०० लोकांना गाईढोरांना कोबंल्यासारखे प्रवास करावा लागतो , बस गाड्या कमी प्रवासी जास्त असल्याचे चित्र आहे बस स्थानकावरून गाडी सुटल्यानंतर प्रवाशांची गर्दी तशीच राहते दुसऱ्या गाडीची वाट पाहत.

“महाराष्ट्र सरकारने महिलांकरता 50% बस भाड्यामध्ये सवलत दिल्यामुळे महिला वर्गांची , लग्नसराई व सणा यामुळे सुद्धा बसमध्ये प्रवाशांची गर्दी वाढली परंतु बस संख्या व फेऱ्या तेवढेच . आधी बस मध्ये ४५-५५ एवढेच प्रवासी प्रवास करायचे परंतु आता हा आकडा एका बस मध्ये १०० पर्यंत वाढला आहे. यावर बस वाहकाचे नियंत्रण राहत नाही.” :- # एक महिला प्रवासी

 -महाराष्ट्र सरकारने महिला प्रवासांना बसमध्ये पन्नास टक्के सवलत देऊन महिला वर्गांना उपहार दिला परंतु बसस्थानकामध्ये बस उपलब्ध होत असल्यामुळे उपलब्ध बसमध्ये गाई – ढोरा प्रमाणे प्रवास करावा लागत असल्याचे खंत व्यक्त केले

#. रामटेक बसस्थानकालावरील वेळेवर बस सुटत नाही आणि फेऱ्या कमी असल्यामुळे प्रवाशांना नियोजित स्थानी वेळेवर पोहोचता येत नाही गर्दीमुळे भुरटे चोरांची रोज दिवाळी साजरी होत आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

# बस तिकीट बिलिंग मशीन ची कमतरता 

प्रवाशांच्या तिकीट काढण्याकरता रामटेक बसस्थानकाला १२८ बस तिकीट बिलिंग मशीन देण्यात आले आहे त्यातील ६४ मशीन खराब आहे तर त्यातील १८ दुरुस्ती करता ठेवला आहे ऐकून ४६ मशीन व्यवस्थित आहे त्यातील काही मशीन नेहमी मध्ये तांत्रिक बिघाड येतो त्यामुळे बस स्थानकावर बस लागूनही तिकीट बिलिंग मशीन वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागते.

 

# प्रभारी इन्चार्ज -आर आर मेहर, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक :  – बस नियमित सुरू आहे, शाळा बंद झाल्यामुळे निळी बस ही नागपूर करता दोन शेड्युल बस व इतर मार्गावरही वाढविण्यात आले, सध्या लग्नसराई व शासनाने महिलांना ५० टक्के सवलत दिल्यामुळे गर्दी वाढली आहे व पुढील काही महिन्यात बारा डिझेल बस व सात इलेक्ट्रिक बस आगारात येणार आहे त्यामुळे प्रश्न सुटेल.

Previous articleकर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव
Next article१७ वर्षीय युवकाची खिंडसि तलावात उडी घेऊन आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here