Home Breaking News पत्ता विचारण्याच्या बहान्याने महिलेला लुटणाऱ्या दोन आरोपीला अटक एक फरार

पत्ता विचारण्याच्या बहान्याने महिलेला लुटणाऱ्या दोन आरोपीला अटक एक फरार

98
0

विशेष प्रतिनिधी:

रामटेक -दिनांक 11 मे 2023 रोजी सौ. शालू देवराम महाजन वय 45 वर्षे राहणार नेहरू वार्ड रामटेक ह्या शांती मंगल कार्यालय रामटेक येथे लग्नकार्यासाठी दुपारी एकटी नेहरूवार्डकडून गांधीवार्डकडे पायी जात असताना गणेश किराणा गांधीवार्ड ,रामटेक समोरील रस्त्यावर एक 30 ते 35 वयोगटातील अनोळखी पुरुष तिच्या समोर आला व त्याने फिर्यादी हिला “गीता मॅडम कहा रहती है मुझे उसका पता बताओ विचारले” मात्र फिर्यादी हिला माहिती नसल्याने माहित नाही असे सांगितले. तेवढ्यात तिथे दुसरा 25-30 वयोगटातील अनोळखी पुरुष आला त्याला पहिल्या अनोळखी पुरुषाने म्हटले की , “तेरी मम्मी की तबियत खराब रहती है. आप दोनो अगरबत्ती लेके आओ. ” नंतर फिर्यादी व अनोळखा दुसरा पुरुष हे अगरबत्ती आणायला जात असताना श्रीराम पान पॅलेस अँड डेली निड्स दुकानाजवळ पहिल्या अनोळखी पुरुषाने दोघांना थांबवले व फिर्यादीला म्हणू लागला की, ” तुम्हारे साडी का पल्लू गाय को लगा जिसके वजह से आपको नजर लगी है तुम अपना गले मे पहना हुआ पिले कलर का धातू निकालो और पर्स मे रखो और साथ वाले लडके के हाथ मे दे दो” असे म्हणाल्यानंतर फिर्यादी यांनी स्वतःच्या गळ्यातील सोन्याचे 14000/- किमतीचे 2.900 ग्राम वजनाचे मंगळसूत्र , ओपो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल 5000/- किंमतीचा, नगदी 1500/- तसेच पॅन कार्ड असा एकूण 20500/- रुपयांचा ऐवज असलेली पर्स जवळ असलेल्या दुसऱ्या अनोळखी पुरुषाच्या हातात दिले त्यानंतर पहिल्या अनोळखी पुरुषा फिर्यादीला म्हणाला की, “अब तुम सामने रखी गाडी तक जाओ और जाते जाते आप अपने विश अपने मन मे बोलो”. फिर्यादी तिथपर्यंत चालत गेली त्यानंतर तिथे पोहोचल्यावर मागे वळून पाहिले असता सदर दोन्ही अनोळखी पुरुष फिर्यादीचा 20500/- रुपयांचा ऐवज तिथून फसवणूक करून घेऊन पडून केले. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन रामटेक येथे अपराध क्रमांक -265 / 2023 कलम 420, 34 भारतीय दंड संहिता अन्वये 3 अनोळखी पुरुषांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला. फिर्यादी व श्रीराम पान पॅलेस अँड डेली निड्सच्या दुकानदाराकडून मिळालेल्या वर्णनावरून तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे यातील आरोपी क्रमांक -1) मोहम्मद सादिक गुलाम रजा वय 23 वर्षे राहणार- हैदरी चौक कामठी, आरोपी क्रमांक 2) सय्यद जिशान सय्यद रिजवान हैदर रिजवी वय 22 वर्षे राहणार- पुराना भोईपुरा कामठी यांना स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल राऊत तसेच त्यांच्या टीमने ताब्यात घेऊन फसवणूक करून प्राप्त केलेले गुन्ह्यातील मंगळसूत्र, ओप्पो कंपनीचे मोबाईल आरोपींकडून जप्त केले व आरोपी तसेच जप्त मुद्देमाल 11 मे 2023 ला येऊन रामटेक पोलिसांच्या ताब्यात दिले. यातील मुख्य आरोपी नामे अमीर सलीम खान उर्फ आयवो राहणार – येरखेडा जिल्हा नागपूर हा फरार असून याचा शोध घेणे सुरू आहे. उर्वरित 2 आरोपी रामटेक पोलीस स्टेशन येथील पोलीस कोठडीत आहेत. सदर गुन्ह्याचा तपास परि. पोलीस उपनिरीक्षक कार्तिक सोनटक्के सह पोलीस शिपाई नितेश डोकरीमारे हे उपविभागीय पोलीस अधिकारी आशित कांबळे रामटेक विभाग तसेच रामटेक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हृदयनारायण यादव यांच्या मार्गदर्शनात करत आहेत.

Previous articleघाट आरक्षित केले पण रेती गरिबाला मिळाली का ? महप्रबोधन यात्रेत सुपर मार्केट येथील सभेत सुषमा अंधारे यांचा घणाघात भाषणास नागरिकांची मोठी गर्दी
Next articleकर्नाटक विजयाचा रामटेकात काँग्रेसच्या वतीने विजय उत्सव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here