Home Breaking News घाट आरक्षित केले पण रेती गरिबाला मिळाली का ? महप्रबोधन यात्रेत सुपर...

घाट आरक्षित केले पण रेती गरिबाला मिळाली का ? महप्रबोधन यात्रेत सुपर मार्केट येथील सभेत सुषमा अंधारे यांचा घणाघात भाषणास नागरिकांची मोठी गर्दी

81
0

विशेष प्रतिनिधी

रामटेक – रामटेक येथील सुपर मार्केट येथे शिवसेने बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेता व प्रवक्ता श्रीमती सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा दिनांक 13 मे 2013 ला सायंकाळी आठ वाजता सुरू झाली. या सभेत या कार्यक्रमाचे मुख्य वक्ता शिवसेना उपनेते श्रीमती अंधारे यांनी म्हटले की रामटेक येथे सर्वात कमी वयाचे आमदार म्हणून अशी उमेदवार दिले व तीन वेळा आमदार म्हणून निवडून आणले खनिज कर्म महामंडळाची राज्यमंत्री दर्जाची सुद्धा जबाबदारी दिली कोकणात, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र इतर ठिकाणी आशिष जयस्वाल यांना ओळखत नाही परंतु या नागपूर ठिकाणी पैसे कमवनारा माणूस म्हणून लोकांना माहित आहे अशा प्रकारच्या घनाघात आरोप करीत सभा गाजवली कॉल वाशरीमुळे पाणी खराब होते जमिनी खराब होतात मोठे नुकसान सहन करावे लागते त्यामुळे लोकांचे आरोग्य खराब होत आहे, 30 टक्के नफा यांच्या जयस्वाल यांच्या खात्यात जाते याकरिता चौकशी लागली आहे , 43 हजार कोटीच्या स्कॅम झाला आहे कागदपत्री त्यांचे नाव येत नाही परंतु फायदा घेणारे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. असे एकच नाही तर रेती घोटाळा कोळसा घोटाळा कॉल वाशरी घोटाळा अशा प्रकारच्या अनेक अवैध घोटाळ्यात स्थानिक आमदार संमिलित असून चौकश्या मंत्रालयातून लागल्या असून आयएएस दर्जाचे अधिकारी चौकशी करीत असून अश्या या चौकश्या व्हाव्यात नाही म्हणून आमदार यांनी फडणवीस यांना आपले मित्र म्हणून अनेक चौकश्या या मॅनेज केल्या आहेत. जेणेकरून कुठलीही चौकशी पूर्ण व्हावी नाही आणि त्यांचे नाव कुठेही मलिन होऊ नये यासाठी तर अनेक नेत्यांवर चौकशी विषयी वारंवार बोलणारे भाजपचे किरीट सोमय्या देखील याविषयी माहिती असून कसे का चौकशी विषयी बोलत नाही आणि चूप असतात म्हणजे ईडी फिडी का ही त्यांची हाताखालची झालीय काय?, 150 करोड लोकांना घर मिळवून देऊ असे मोदी नी सांगितले होते , काय प्रत्येक लोकांना घर देणार आहे का भारताची लोकसंख्या किती?

मन की बात मध्ये जन की बात करते नही २०१४ मध्ये १०० दिवसात महागाई कमी करून दाखवू पण केलं का जे सिलेंडर  २०१४ ला ४१० रुपयेला मिळत होते आता १०५३ ला मिळत आहे दूध ३५ रू.ला मिळणारे आता ६० रू.ला मिळत आहे.

कर्नाटक मध्ये जेव्हा हार होणे निश्चित होते तेव्हा महाराष्ट्राचा फडणवीस सांगायला गेले बजरंग बली चे अपमान झाला आहे . तरुण पोरं रोजगार देणं शक्य नव्हते त्यांना धर्माच्या नावावर लढवायला उभ केल, रोजगार सुरू केले नाही.

शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, माजी खासदार प्रकाश जाधव, राजू भाऊ हरणे , बलाभाऊ राऊत, हरीचंद टाकले

कार्यक्रमाचे आयोजक रामटेक विधानसभा प्रमुख विशाल बरबटे होते, यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.

Previous articleखापा न.प.चे कालबेलिया राजस्थानी नृत्य विभागीय स्पर्धेत प्रथम
Next articleपत्ता विचारण्याच्या बहान्याने महिलेला लुटणाऱ्या दोन आरोपीला अटक एक फरार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here