Home Culture खापा न.प.चे कालबेलिया राजस्थानी नृत्य विभागीय स्पर्धेत प्रथम

खापा न.प.चे कालबेलिया राजस्थानी नृत्य विभागीय स्पर्धेत प्रथम

139
0

सावनेर/खापा (Saoner/Khapa):- गोंदिया येथे न.प. कर्मचाऱ्यांसाठी पार पडलेल्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत खापा न.प.च्या प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी बाजी मारत विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.

गोंदिया जिल्ह्यात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांसाठी दोन दिवसीय विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात नागपूर विभागातील एकूण ७४ नगरपरिषदेने भाग घेतला होता.याप्रसंगी हॉलीबॉल, कबड्डी,क्रिकेट बॅडमिंटन आदि कार्यक्रमासह सांस्कृतिक स्पर्धा कार्यक्रम पार पडले.

याप्रसंगी खापा नगर परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी गुलाबो सपेरा यांच्या जीवनावर आधारित कालबेलिया या गीतावर राजस्थानी सामूहिक नृत्य सादर करीत विभागीय स्पर्धेत नागपूर विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त केला.यात अर्चना राऊत, माधुरी बालपांडे, मीनाक्षी घाटोळे, जयश्री बिरमोड, विद्या ढवळे आदीं शिक्षिकांनी उत्कृष्ट असे सामुहिक नृत्य सादर करीत रसिकांची मने जिंकली.व विभागीय स्पर्धेत प्रथम स्थान प्राप्त केले.

याबद्दल मा. विजयालक्ष्मी बिदरी विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर,मा.संघमित्रा ढोके विभागीय सह आयुक्त न.पा.प्र.नागपूर विभाग नागपूर यांच्या हस्ते शिल्ड, मेडल व आठ हजार रुपये रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यातआला.

नगरपरिषद प्राथमिक प्राथमिक शाळेच्या शिक्षिकांनी विभागीय स्पर्धेत नागपूर विभागत प्रथम स्थान प्राप्त करून खापा नागरपरिषेच्या यशात नवा तुरा रोवला.त्यांच्या या यशाबद्दल न.प. कस्तुरबा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अर्चना टेंभुर्णे,विद्या ढवळे,मुकेश वाहने,मीना बोंडे,कल्पना खुसराम,बैलमारे, बोकडे मेश्राम,नगरपरिषद पदाधिकारी, कर्मचारी व शिक्षक वृंद आदिंनी अभिनंदन केले.

बातमी संकलन: किशोर गणविर 

Previous articleजोगीसाखरात पार पडले आरोग्य शिबीर, शिबिरात ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण 
Next articleघाट आरक्षित केले पण रेती गरिबाला मिळाली का ? महप्रबोधन यात्रेत सुपर मार्केट येथील सभेत सुषमा अंधारे यांचा घणाघात भाषणास नागरिकांची मोठी गर्दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here