Home Breaking News नगरपंचायतने कचरा व्यवस्थापनात घ्यावी खबरदारी, नागरिकांच्या जीवाशी होणारा धोकादायक खेळ थांबवावा

नगरपंचायतने कचरा व्यवस्थापनात घ्यावी खबरदारी, नागरिकांच्या जीवाशी होणारा धोकादायक खेळ थांबवावा

92
0

पारशिवणी (Parseoni) :नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत येणार्‍या नगर पंचायत पारशिवनी मार्फत नियमांची सर्रास पायमल्ली केली जात असून नियमानुसार वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावावी असा कचरा खुलेआम जाळला जात आहे. नगर पंचायत पारशिवनी हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन केंद्र सध्या पांढरा हत्ती ठरत आहे. या कचरा विल्हेवाट केंद्रात कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या नावाखाली नुसती बदनामी केली जात आहे. या कचरा व्यवस्थापन केंद्रासाठी नगर पंचायत पारशिवनी कडून महिन्याला सुमारे 8 लाख 50 हजार रुपये खर्च केले जातात, तर कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून येथील महिला कर्मचारी स्वत:च डोक्यावर कचरा उचलून त्याला आग लावताना दिसत आहेत. या आगीमुळे धुराचे लोट उठल्याने परिसरातून जाणे कठीण झाले आहे, तर दुसरीकडे नगर पंचायत पारशिवनी यांच्या दुर्लक्षामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पारशिवनी नगर पंचायत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या कृत्याकडे डोळेझाक करून बसले असताना दुसरीकडे नगर पंचायत अध्यक्षांसह नगरसेवक, नगरसेविका यांनी आवाज न उठवल्याने नगर पंचायत पारशिवणीच्या या कृतीवर सर्वजण शांत बसले आहेत.

नगर पंचायत पारशिवनी यांनी उभारलेल्या कचरा वर्गीकरण शेडमध्ये जंगली झाडे उगवलेली असल्याने वर्गीकृत कचरा कुठे ठेवला जातो, हा देखील शोध घेण्याचा विषय आहे. नगर पंचायत पारशिवनी येथे दररोज ५० टन घनकचऱ्याचे वर्गीकरण करावे लागते, तर घातक कचरा प्रक्रिया केंद्रात १०० मेट्रिक टन क्षमतेचा प्लांट उभारूनही त्याचा उपयोग होत नाही.

#अर्चना वंजारी, मुख्याधिकारी नगरपंचायत पारशिवनी, :- नगर पंचायतीने कचरा जाळण्याबाबत कोणताही आदेश दिलेला नसून, या प्रकरणात कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी सामील असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

Previous articleखाप्यातील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर आरोपींना अटक
Next articleजोगीसाखरात पार पडले आरोग्य शिबीर, शिबिरात ग्रामस्थांना फॅमिली हेल्थ कार्डचे वितरण 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here