Home Health खापा शहरात पाणी टंचाई, दुषित पाणीपुरवठा नागरिकांचे पाणीपुरवठा विभागास निवेदन

खापा शहरात पाणी टंचाई, दुषित पाणीपुरवठा नागरिकांचे पाणीपुरवठा विभागास निवेदन

104
0

सावनेर/खापा (Saoner/ Khapa) :- शहरात नियमित पाणीपुरवठा होत नसुन दुषित व गढुळ पाणी येत असल्याने नागरिक ञस्त आहे.भर उन्हाळ्यात शहरात दोन दोन तीन तीन दिवस नळ येत नसल्याने संतप्त नागरिकांनी सोमवार दुपारी नगर परिषदे समोर निदर्शने करून रोष व्यक्त केला व न.प. पाणीपुरवठा विभागास निवेदन खापा शहर युवक काँग्रेस अध्यक्ष मृणाल हरडे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.

शहरात गेल्या एक दोन महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.दूषित पाणी पुरवठ्याने गॅस्ट्रो , मलेरियासारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरात पाणीपुरवठा बरोबर होत नाही.वेळेवर नळ येत नाही.आलेस तर पंधरा मिनिटे अर्ध्या तासातच लवकर चालले जातात.कधी कधी एक एक दोन दोन तीन तीन दिवस पाणीपुरवठा बंद असतो.
खापा शहरात बारमाही वाहणारी कन्हान नदी असून पाणी भरपूर असून सुद्धा खाप्यावासीयांना पाणी टंचाईच्या सामना करावा लागत आहे .भर उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिक संतापले आहे.
फिल्टर प्लांट असूनही गढूळ पाणी खापावासीयांना प्यावे लागते. खापा शहरात बारमाही वाहणारी कन्हान नदि असूनही खापा शहर तहानलेच आहे. खाप्यावरून सावनेर शहराला पाणीपुरवठा बरोबर होत आहे. शहरात कन्हान नदि असून पाणी भरपुर प्रमाणात असताना शहरातील नागरिकांना पाणी मिळत नाही. ही एक खापा शहराची शोकांतिकाच आहे.
याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिकेला अजूनही जाग आली नाही.दूषित गढुळ पाण्यामुळे मोठी घटना घडल्या वरच नगरपालिकेला जाग येणार का?दुषीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास नगरपालिका यास सर्वश्री जबाबदार राहील.याची नोंद घ्यावी.आठ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करून दूषित गढुळ पाण्याची समस्या दूर करण्यात यावी.व नागरिकांना शुद्ध पाण्याचा नियमित पाणीपुरवठा करण्यात यावा.अन्यथा नगरपालिके समोर आमरण ऊपोषण करण्यात येण्याचा ईशारा नागरिकांनी दिला.याप्रसंगी मुकेश पावडे,शाखिर शेख,बलराज सुरकार,मोहशिन पठाण,मस्तान कुरेशी, नेहल सुपारे आदि शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया :
“सतत दोन दिवस संपूर्ण गावांमधील पाणीपुरवठा बंद आहे तरीही खापा नगरपरिषद ने कुठल्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही‌.व पाणीपुरवठा बरोबर होत नाही.फिल्टर प्लांट असूनही गढुळ पाणी प्यावे लागते.”
# मुकेश पावडे सामाजिक कार्यकर्ता खापा

प्रतिक्रिया
“खापा शहरात कन्हान नदि असुनही पाणी टंचाई चा सामना करावा लागत आहे दोन दोन दिवस नळ येत नाही.पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला तर तर फोन उचलत नाही.अरेरावीची वगैरे उत्तर देतात. दुषित पाणीपुरवठा होतो.आठ दिवसात
पाणीपुरवठा सुरुवात करावा अन्यथा नगरपालिके समोर आमरण उपोषण करणार.”
# मृणाल हरडे
शहर युवक काँग्रेस अध्यक्ष खापा

 

Previous articleमहाराष्ट्र अंनिस चा महिला प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न
Next articleखाप्यातील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर आरोपींना अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here