Home Breaking News खाप्यातील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर आरोपींना अटक

खाप्यातील ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांची धाड, लाखोंचा मुद्देमाल जप्त तर आरोपींना अटक

84
0

सावनेर (Saoner) :- खापा शहरातील बाजार चौकात सुरू असलेल्या अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरवर नागपूर ग्रामीण पोलीसांच्या विशेष पथकाने व खापा पोलीस यांच्या मदतीने शनिवारी दुपारी तीनच्या सुमाराच्या छापा टाकून कारवाई करण्यात आली.यावेळी ऑनलाइन लॉटरी सेंटरचे मालक करीम कुरेशी सह एकूण 18 आरोपींना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार नागपूर ग्रामीण पोलीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खापा शहरात अवैधरित्या ऑनलाईन लॉटरी सेंटर सुरू असल्याची माहिती मिळाली असल्याने नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आयपीएस पोलीस अधिकारी अनिल मस्के व डीवायएसपी राहुल झालटे यांच्या पथकाने साफडा रचून खापा पोलिसाच्या मदतीने खापा शहर बाजार चौकातील नगर परिषद व्यापारी संकुलाच्या गाळ्यात सुरू असलेल्या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर छापा टाकून कारवाई केली‌.यावेळी 43 हजार रोख , सोळा मोबाईल ,ऑनलाईन लॉटरी सेंटर मधील साहित्यासह एकुन एक लाख 89 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.यावेळी एकूण 18 आरोपींना अटक करून संपूर्ण आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत खापा पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार शिवाजी नागवे ,पी.एस.आय.शिवाजी बोरकर , पोलीस शिपाई व होमगार्ड यांनी सहकार्य केले.

बातमी संकलन: किशोर गणवीर

Previous articleखापा शहरात पाणी टंचाई, दुषित पाणीपुरवठा नागरिकांचे पाणीपुरवठा विभागास निवेदन
Next articleनगरपंचायतने कचरा व्यवस्थापनात घ्यावी खबरदारी, नागरिकांच्या जीवाशी होणारा धोकादायक खेळ थांबवावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here