Home Crime महाराष्ट्र अंनिस चा महिला प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न

महाराष्ट्र अंनिस चा महिला प्रेरणा मेळावा उत्साहात संपन्न

106
0
  • रामटेक (Ramtek) :- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा रामटेक व नागपूर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने रामटेक स्थित शिवाजीराव ऊराडे शाळेच्या इमारतीमध्ये जिल्हा महिला मेळावा साजरा करण्यात आला. मेळाव्यामध्ये नवीन सदस्यांचे स्वागत व त्यांचा परिचय करून घेतला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संविधान प्रास्ताविकेचे वाचन रामटेक शाखेचे कार्याध्यक्ष दीपा चव्हाण यांनी केले. त्यानंतर शाखेच्या प्रधान सचिव शुभा थूलकर यांनी अंधश्रद्धेवर रचलेले गीत स्वतः गावून सादर केले. तसेच समिती काय काम करते याबाबत चैताली रामटेके यांच्याकडून महिलांना माहिती सांगण्यात आली. उत्तर नागपूर शाखेच्या कार्याध्यक्षा मंजुश्री फोफरे यांनी चमत्कार सादरीकरण करून दाखवले. त्यामुळे समितीमध्ये जुळलेल्या नवीन सदस्यांमध्ये कुतूहल वाढले. त्यांच्यामध्ये समिती सोबत उत्साहाने काम करण्याची ईच्छा दर्शविली. सर्व महिलासोबत मोकळा संवाद साधला. चमत्कार सादरीकरणा नंतर चमत्कार कसे होतात याचे स्पष्टीकरण देताना उपस्थित महिलांनी स्वतःचे फसवणुकीचे अनुभव सांगितले व यानंतर आम्ही अशा अंधश्रद्धेला बळी पडणार नाही असा निश्चय केला. डॉ. कविता मते यांनी महिलांशी हितगुज केले. सर्वांना महाराष्ट्र अंनिसचे काम आवडले. यावेळेस नागपूर जिल्हा कार्यवाह दुर्गा लोंढे, रामटेक शाखेचे पदाधिकारी सरला नाईक सक्रिय कार्यकर्ते नंदाताई खडसे, बेबी नंदा चौधरी ,अंतिका मेश्राम, रीना तायवाडे, तिलोत्तमा मेश्राम, दक्षिण नागपूर शाखेच्या उपाध्यक्ष लता ढोक, प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सी .एम .आर .सी. चे मॅनेजर सचिन भिलकर, उपजीविका सल्लागार धनंजय तांबुलकर, लेखापाल अमित सर व इतर नवीन सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Previous articleबुद्ध पौर्णिमा निमित्त शांती रॅली चे आयोजन
Next articleखापा शहरात पाणी टंचाई, दुषित पाणीपुरवठा नागरिकांचे पाणीपुरवठा विभागास निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here