Home Culture बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मरैली व भोजनदानाचे आयोजन

बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मरैली व भोजनदानाचे आयोजन

110
0

नागपूर/कन्हान (Nagpur/Kanhan) :- कन्हान येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त भव्य धम्मरैलीचे आयोजन रिपब्लिकन सांस्कृतिक संघाच्या वतीने करण्यात आले होते . तथागत गौतम बुध्द प्रतिमा , सम्राट अशोक, संत कबीर , क्रांतिसूर्य महात्मा फुले , सावित्रीआई फुले यांचे कटआउट , सूंदर देखावे व आखाडा प्रात्यक्षिक धम्मरैलीचे आकर्षण ठरले.

महाकारुणिक तथागत गौतम बुध्द जयंती निमित्त शांति संदेश प्रेषित करण्यासाठी भव्य रैलीचे आयोजन कन्हान येथे करण्यात आले होते. पंचशील नगर सत्रापुर येथून नागपुर – जबलपुर महामार्गावरुन रैली निघाली होती . ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला सकाळी पारशिवनीचे तहसीलदार प्रशांत सांगडे, आयोजक चंद्रशेखर भिमटे तर सायंकाळी भंते के.सी.एस लामा महाथेरो कन्हानचे सहायक पोलीस निरिक्षक दिलीप पोटभरे, कैलास बोरकर , चेतन मेश्राम, मनोज गोंडाने , रोहित मानवटकर, यांनी माल्यापर्ण करून अभिवादन केले . रैलीत गुरुकृपा अखाड्याचे प्रशिक्षक नीलेश गाढ़वे यांच्या मार्गदर्शनात अखाड़ापटु अनिकेत निमजे , सूरज चौहान, उज्वल कांबळे , सिद्धार्थ सातपैसे , निकिता बेले , प्राजी टाक़ळखेड़े , मनस्वी कांबळे , रानी गुड़दे यांनी विविध कलाचे आकर्षक प्रदर्शन केले .

कन्हान येथील तारसा रोड चौक ते सात नंबर नाका येथील सुजाता बुद्ध विहारात महाकारूणी तथागत बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला भंते के.सी.एस लामा महाथेरो, रोहीत मानवटकर, मल्यार्पण करुन बुद्धवंदनेने रैलीचे समापन झाले. कार्यक्रमाचे संचालन नितीन मेश्राम, तर आभार प्रदर्शन कैलास बोरकर यांनी केले.

कार्यक्रमा सफलार्थ ,अश्वमेघ पाटिल शैलेश दिवे,अभिजित चांदुरकर, पंकज रामटेके, रमेश गोड़घाटे, धनंजय कापसीकर,महेंद्र चव्हाण, राजेश फुलझेले, आनंद चव्हाण, मिलिंद मेश्राम, चंद्रमनी पाटील, संजय गजभिये, रवींद्र दुपारे, संजय चहांदे,अमोल मेश्राम, पृथ्वीराज चव्हाण, कृष्णा उके, विनोद बावनगडे, मनोज शेंडे, नविन सहारे, नितेश टेंभुर्णे, निखिल रामटेके, जितेन्द्र टेभूर्णे, अखिलेश मेश्राम, दिपचंद शेंडे, प्रवीण सानेकर, रुपेश सोमकुवर, अमीत नगरारे, विक्रांत कोंडपनेनी आदिनी परिश्रम घेतले. रैली मध्ये आकर्षणच्या केंद्र असलेल्या महाकारूणी तथागत बुद्धांचे प्रतिमेला सामाजिक व राजकीय संघटना ने अभिवादन केले.

विविध ठिकाणी रैलीचे स्वागत : सत्रापुर पंचशील नगर ते सात नंबर नाका पर्यतच्या धम्मरैलीचे चंदन मेश्राम व मित्र परिवार यांच्या वतीने महात्मा गांधी चौक येथे हलवा वाटप,राणे केटरर्स समोर येथे अजय चव्हाण मित्र परिवार व दुकानदार संघाच्या यांच्या वतीने खीर वाटप, होम पाईप समोर सेजल ज्यूस सेंटर यांच्या वतीने खीर व ज्यूस वाटप तसेच सिद्धार्थ कॉलनी महिला मंडळ यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे खीर वाटप, पंजाब नॅशनल बँक समोर वंचित बहुजन आघाडी यांच्या वतीने मिठाई व पाणी वाटप तसेच नाका नंबर सात येथे सुजाता बुद्ध विहार यांच्या वतीने खीर वाटप तसेच बादल कापसे व मित्र परिवार यांच्या वतीने भव्य भोजंन दान वाटप, विविध सामाजिक व राजकीय संघटना ने यांच्या वतीने वाटप करण्यात आले.

बातमी संकलन : विवेक पाटील

Previous articleटेंभुरडोह येथे किसान विकास परिषद, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा मंथन
Next articleबुद्ध पौर्णिमा निमित्त शांती रॅली चे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here