Home Breaking News उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार

उभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार

140
0

रामटेक/ देवलापार (RAMTEK/Deolapar) :- नागपूर -जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वर देवलापार नजीकच्या बांद्रा शिवारात उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकीच्या जोरदार धडकेत एक ठार तर एक गंभीर जखमी झाला.

हि घटना शुक्रवारला दुपारी २ वाजताचे दरम्यान घटना घडली. मृतकाचे नाव योगेंद्र सोनवाणे (३० वर्ष) राहणार खमारीया (मध्यप्रदेश) तर जखमीचे नाव रितिक घाटे असे आहे.

प्राप्त माहितीनुसार,शुक्रवार रोजी नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गाने मध्यप्रदेश येथील कटांगी जवळील खमारीया या आपल्या मुळ गावी दुचाकी क्रमांक एम पी ५०/एम टी-५४३२ने योगेंद्र सोनवणे व त्याचा मित्र रितिक घाटे जात असताना बांद्रा शिवारात रस्त्याचे कडेला उभा असलेल्या ट्रक क्रमांक आर जे ०९/जी सी -७७३८ ला दुचाकीने मागून जोरदार धडक मारल्याने योगेंद्र सोनवाणे (३०) राहणार खामरिया जागीच ठार झाला, तर मागे बसलेला रीतिक घाटे राहणार पवनी गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना दुपारी २ वाजताचे सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच देवलापारचे ठाणेदार मेश्राम आपल्या कर्मचाऱ्यासह घटनास्थळी पोहचले. तात्काळ ओरियंटल कंपनीची रुग्णवाहीका बोलावून जखमीला देवलापार ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचार करून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याच रुग्णवाहिकेने डॉ, हनवत प्रवीण ठाकूर,आकाश यादव यांनी पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकल कॉलेजला हलविले.जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.सदर घटनेचा पुढील तपास देवलापारचे ठाणेदार मेश्राम यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

बातमी संकलन: पंकज चौधरी

Previous articleखाप्यात भरली शासकिय योजनांची जञा
Next articleटेंभुरडोह येथे किसान विकास परिषद, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा मंथन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here