Home Breaking News खाप्यात भरली शासकिय योजनांची जञा

खाप्यात भरली शासकिय योजनांची जञा

201
0

सावनेर/खापा (Saoner/Khapa):-:जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची या योजनेअंतर्गत शासनाने 17 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 दरम्यान शिबिराचे आयोजन करण्याची घोषणा केलीआहे.त्या अनुषंगाने सावनेर तालुक्यात बडेगाव येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली.

तर सावनेर तालुक्यातील जञा योजनेचे दुसरे शिबिर खापा येथील नगर परिषद राजेंद्र हायस्कुल येथे बुधवार पासून दोन दिवसिय शासकिय जञा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सावनेर तहसीलदार प्रताप वाघमारे यांचे अध्यक्षते खाली शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी खंडविकास अधिकारी दिपक गरूड,नायब तहसीलदार संदिप डाबेराव,

संजय गांधी निराधार चे नायब तहसीलदार संजय अनवाने,विजय कोहळे,प्रमोद चौधरीनिवडणुक विभाग,जि.प.सदस्या ज्योतीताई शिरसकर आदिंची उपस्थिती होती.

ही शासकिय योजनांची जञा नागरिकांना शासकिय योजनेची माहीती मिळावी व त्यांची वेळीच कामे मार्गी लागून नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळावा.या उद्देशानेया शासकीय जत्रेचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान यावेळी तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी केले.

याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. जननी सुरक्षा योजना , प्रधानमंत्री मातृ वंदना,फेरफार,महसुल विभागासी निगडीत कामे,आधार कार्ड, दिव्यांगाची नोंदणी, फळबाग लागवड,रक्त तपासणी नमुने,शेतीविषय योजना,संजय गांधी निराधार, अन्नपुरवठा, आरोग्य विभाग, वन विभाग शासकिय विभागाचे ,कृषी विभाग आदि विभागाचे कर्मचारी व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.नागरिकांची जत्रा शिबिराच्या लाभ घेण्यासाठी गर्दी उसळली होती.

नागरिकांना पदाधिकाऱ्यांनी शासकीय योजना ची माहिती देऊन शासकीय योजनाच्या लाभ घेण्यास ईच्छुक व्यक्तीचे नोंदणी करून फॉर्म जमा करून घेतले.तर राशन कार्ड ,सातबारा आठ तर आधार कार्ड आदि नागरिकांचे कामे लगेच मार्गी लागले. जत्रेतून नागरिकांची अनेक कामे मार्गी लागली असून शासकीय योजनेची माहिती मिळाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

याप्रसंगी खापा परिसरातील तसेच वाकोडी जिल्हा परिषद सर्कल मधील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून शिबिराच्या लाभ घेतला.

बातमी संकलन: किशोर गणवीर 

Previous articleकोथुळणा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
Next articleउभ्या ट्रक ला दुचाकीची धडक, चालक जागीच ठार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here