Home Culture कोथुळणा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

कोथुळणा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

59
0

सावनेर (Saoner) :- कोथुळणा येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात ग्रामपंचायत सदस्य व सर्व गावकरी मंडळींच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन उत्साह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गीता आमगांवकर होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच हरीष चौधरी,vग्रा.पं.सदस्य प्रशांत कोलते, योगराज चिमोटे आदिंची उपस्थिती होती.

याप्रसंगी सी.आर.पी.एफ. मध्ये कार्यरत असलेल्या गावातील सचिन भोयर या युवा तरुणाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत च्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.तसेच होतकरू व प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या युवा तरुणांच्या सत्कार करण्यात आला.

सीआरपीएफ मध्ये कार्यरत असलेले युवा तरुण सचिन भोयर व नागपुर ग्रामीण पोलीस विभागात निवड झालेल्या अंकित गजबे यांचा सरपंच गीता आमगांवकर यांचे हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या काजल घनश्याम दादरे, माधुरी मनोहर चौरेवार , खुशबू रवींद्र कोहळे या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर बक्षीस देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी ग्रा.पं. सचिव बन्सोड, ग्रा.पं.सदस्य लंकाबाई बिहोणे,मुन्नीबाई दादरे,सुनिता सुरजपारे, कमलाबाई पिपरेवार,रंजना जांभुळे,मुन्नाभाऊ आमगांवकर, योगेंद्र बेले आदिंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

बातमी संकलन : किशोर गणवीर 

Previous articleखापा येथे “आपला दवाखाना ” चे डिजिटल अनावरण
Next articleखाप्यात भरली शासकिय योजनांची जञा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here