Home Social शासकिय योजनांचा जत्रेचा शेकडो स्थानिकांनी घेतला लाभ

शासकिय योजनांचा जत्रेचा शेकडो स्थानिकांनी घेतला लाभ

146
0

सावनेर (Saoner) :- जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची या योजनेअंतर्गत शासनाने 17 एप्रिल 2023 ते 15 जून 2023 दरम्यान शिबिराचे आयोजन करण्याची घोषणा केलीआहे.

सावनेर तालुक्यात बडेगाव येथून या योजनेची सुरुवात करण्यात आली.सावनेर तालुक्यातील बडेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जत्रा शासकीय योजनांची सर्वसामान्यांच्या विकासाची या अभियाना अंतर्गत दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन सावनेर येथील उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून सावनेरचे तहसीलदार प्रताप वाघमारे,नायब तहसीलदार संदीप डांबेराव , कृषी अधिकारी शुभांगी राठोड ,आरोग्य अधिकारी प्रशांत वाघ ,जिल्हा परिषद सदस्य छाया बनसिंगे, बडेगांव सरपंच ज्योती चौधरी ,माजी जि. प. सदस्य विजय देशमुख आदींची उपस्थिती होती.

याप्रसंगी शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली.शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचाव्या व त्याच्या लाभ नागरिकांना सहजरीत्या मिळावा या उद्देशाने त्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे  सावनेर चे उपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांनी याप्रसंगी सांगितले.बडेगाव जिल्हा परिषद सर्कल मधील नागरिकांनी शेकडोच्या संख्येने उपस्थित राहून शिबिराच्या लाभ घेतला.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गजानन कुरंवाडे,वैद्यनाथ डोंगरे ,महसूल विभाग, आरोग्य विभाग, पशुसंवर्धन विभाग, भूमी अभिलेख विभाग,संजय गांधी  निराधार विभाग ,वन विभाग आदी विभागांच्या कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी संकलन : किशोर गणवीर 

Previous articleकिसान विरोधी कानून’ या हिंदी पुस्तकाचे नागपूर येथे प्रकाशन
Next articleकृषी उत्पन्न बाजार समितीवर 14 जागा जिंकत सचिन किरपान गटाच्या कब्जा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here