Home Breaking News खापा येथे “आपला दवाखाना ” चे डिजिटल अनावरण

खापा येथे “आपला दवाखाना ” चे डिजिटल अनावरण

192
0

सावनेर (Saoner) :- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित खापा येथील बाजार चौकातील राय कॉम्प्लेक्स मध्ये हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना डिजिटल अनावरण कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माजी कॅबिनेट मंत्री मा. आमदार सुनील केदार यांच्या हस्ते ऊद्धाटन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकर्डे होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून कु.कुंदाताई राऊत जि. प. उपाध्यक्ष,अरुणाताई शिंदे सभापती,जि.प.सदस्य ज्योतीताई शिरसकर,माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर कुंभारे,प.स.सदस्य प्रकाश पराते,गोविंदा ठाकरे,ममता केसरे,गणेश काकडे आदिंची उपस्थिती होती.
याप्रसंगी आ.सुनिल केदार यांनी
परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्या व नागरिकांना याच्या लाभ मिळावा या अनुषंगाने आपला दवाखाना सुरू करण्यात आला आहे.तसेच
नगरपरिषद , स्थानिक पदाधिकारी , आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी याबाबत सहकार्य करावे. तसेच अधिकारी व कर्मचारी यांना योग्य गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देण्याच्या सूचना दिल्या.
तर जि.प.अध्यक्ष मुक्ता कोकर्डे यांनी गोरगरीब जनतेकरिता सुरू करण्यात आलेल्या आपला दवाखाना चा नागरिकांनी लाभ घेण्याचे आव्हान केले.

गुणवत्ता पूर्ण आरोग्य सेवा देण्यात याव्या… आ. सुनील केदार

यावेळी सुरेश चंद्रवंशी, नारायण लांबट, मृणाल हरडे, कैलास कापसे, पराग चिंचखेडे, नामदेव गजभिये, डॉ. प्रशांत तेलसे, डॉ. वर्षा शंकरवार वैद्यकीय अधिकारी खापा,ए.एस.पाल,आर.बी चन्ने आरोग्य सहाय्यक, पुष्पा ऊईके,सारिका परमोरे, आशा सेविका व आरोग्य कर्मचारी आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ. प्रशांत वाघ तालुका वैद्यकीय अधिकारी सावनेर यांनी केले. सूत्रसंचालन मधुकर सोनवणे तर डॉ. वर्षा शंकरवार यांनी आभार मानले.

बातमी संकलन : किशोर गणवीर 

Previous articleकृषी उत्पन्न बाजार समितीवर 14 जागा जिंकत सचिन किरपान गटाच्या कब्जा
Next articleकोथुळणा येथे विविध स्पर्धांचे आयोजन करून महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here