Home Culture कृषी उत्पन्न बाजार समितीवर 14 जागा जिंकत सचिन किरपान गटाच्या कब्जा

कृषी उत्पन्न बाजार समितीवर 14 जागा जिंकत सचिन किरपान गटाच्या कब्जा

153
0

नागपूर/रामटेक (Nagpur/Ramtek):- — रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवार दिनांक 28 एप्रिल संपन्न झालेल्या मतदानानंतर 29 एप्रिलला झालेल्या मतदानानंतर सुनील केदार व आमदार आशिष जयस्वाल यांच्या गटाला एकही जागा जिंकता आलेली नाही याउलट सुनील केदार यांच्याशी जागा वाटपाबद्दल विनसल्यानंतर स्वतंत्रपणे गट तयार करून केदार यांच्या कट्टर समर्थक असलेल्या सचिन किरपान यांनी लढविलेल्या शेतकरी सहकार पॅनल घणघणीत यश संपादन करीत 18 पैकी 14 जागेवर बाजी मारली आहे त्यामुळे बहुपतिषित रामटेक बाजार समितीवर सचिन किरपान यांच्या गटाच्या कब्जा झालेला आहे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, उदयसिंग यादव प्रहार चे रमेश कारमोरे गोगोपाचे हरीश उईके यांना एकत्र येऊन तयार केलेल्या शेतकरी सहकार विकास पॅनल ला ग्रामपंचायत गटातील सर्व चार जागा जिंकण्यात यश मिळाले आहे

शनिवारला सकाळी नऊ वाजता पासून मतमोजणी ला करण्याला सुरुवात झाली सर्वप्रथम ग्रामपंचायतच्या चार जागांचे निकाल हाती आले
यामध्ये सेवा सहकारी संस्था गटातील सचिन किरपान, विरेश आस्टणकर, त्रिलोक मेहेर, रामू झाडे, यशवंत भलावी, झनकलाल मरस कोल्हे, नरेश मोहन, लक्ष्मी कुंभरे, साबेरा पठाण, निळकंठ महाजन, नकुल बरबटे,
ग्रामपंचायत मतदार संघातून रणवीर यादव, उमेश भांडारकर, बाबू वरखडे, योगेश माथारे
# अडते व व्यापारी संघातून भीमराव आंबिलडुके , विजय मदनकर,
# हमाल व मापाडी मतदार संघातून शंकर तांबुलकर

यानंतर मत मोजणी केंद्रा परिसरात ढोल ताशाच्या आवाजात गुलाल उधळला गेला व विजयी मिरवणूक काढण्यात आली .

Previous articleशासकिय योजनांचा जत्रेचा शेकडो स्थानिकांनी घेतला लाभ
Next articleखापा येथे “आपला दवाखाना ” चे डिजिटल अनावरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here