Home Crime किसान विरोधी कानून’ या हिंदी पुस्तकाचे नागपूर येथे प्रकाशन

किसान विरोधी कानून’ या हिंदी पुस्तकाचे नागपूर येथे प्रकाशन

111
0

सावनेर (Saoner) :-  शेतकरी विरोधी कायदे’ या मराठी पुस्तकाचे हिंदी भाषांतर असलेल्या ‘किसान विरोधी कानून’ या पुस्तिकेचे प्रकाशन 1 मे 23 रोजी नागपूर येथे किसान विकास परिषदेत होणार आहे.

अमर हबीब यांनी लिहिलेली ही पुस्तिका प्रश्नोत्तर पद्धतीची आहे. मराठीच्या आठ हजारहून अधिक प्रति वितरित झाल्या आहेत. किसानपुत्र आंदोलन याच पुस्तिकेच्या आधारे चालते. सीलिंग, आवश्यक वस्तू, जमीन अधिग्रहण हे कायदे कसे शेतकऱ्यांना गळफास आहेत हे यात दाखवून दिले आहे. हिंदी भाषिकांसाठी या पुस्तिकेचा अनुवाद अमर हबीब यांनीच केला आहे.

बातमी संकलन: किशोर गणवीर 

नागपूर येथे 1 मे रोजी होत असलेल्या प्रथम किसान विकास परिषेदेत या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे, अशी माहिती दत्तात्रेय ठाकरे व सुधाकर इंगोले यांनी दिली. ही परिषद शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नांवर विचार करून तोडगा जाहीर करणार आहे.परिषद टेंभूरडोह (ता.सावनेर) येथील टायगर फोर्ट ईको रिसॉर्ट येथे दुपारी 2 वाजता सुरू होईल. यात शेतकरी प्रश्नांवर काम करणारे अनेक अनुभवी नेते सहभागी होणार आहेत.

Previous articleजागतिक वसुंधरा दिवस साजरा…
Next articleशासकिय योजनांचा जत्रेचा शेकडो स्थानिकांनी घेतला लाभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here