Home Breaking News सातबारा वरिल लिज चा बोजा त्वरित हटवा…सातबारा कोरा करा.. खापा परिसरातील शेतकऱ्यांची...

सातबारा वरिल लिज चा बोजा त्वरित हटवा…सातबारा कोरा करा.. खापा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी.

159
0

नागपूर/सावनेर (Nagpur/Saoner) :-  गुमगाव मायल खान कडुन केंद्र शासनाच्या आदेशाने खापा परिसरातील  कोदेगांव, गुमगांव, तिघई येथील  जवळपास तीनशे शेतकऱ्यांच्या सातबारावर पन्नास वर्षांपर्यंत लिजवर भाडे तत्वावर जमिन घेतली असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कसलेही प्रकारच्या विचारात न घेतल्याने लिज चा बोजा चढविला असल्या कारणास्त शेतकरी संतापले आहे. सातबारा वरील चढवलेला लिज बोजा नोंद त्वरित काढून सातबारा कोरा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

याबाबत शेतकऱ्यांची गुमगांव मायल पदाधिकारी व तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या उपस्थिती गुमगांव मायल खान येथे बैठक पार पडली.

शेतकऱ्यांचा संताप बघुन याबाबत तहसीलदार यांनी शेतकऱ्यांचा गैरसमज दुर करत सातबारात केलेल्या  नोंदीतील त्रुटी दुरुस्त करून शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या त्रास होणार नाही अशी नोंद करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाच्या आदेश असल्याने सातबारावर नोंद करणे आवश्यक असल्याचे मत तहसीलदार वाघमारे यांनी व्यक्त केले.

शेतकऱ्यांना शेती विकणे बँकेकडून कर्ज घेणे यात कसले त्रास होणार नाही तसेच जमिनीचे मालक आपण स्वतः असून जमिनीवर वरील कोणत्याही प्रकारचे आम्ही कसलेही काम करणार नाही. जमिनीच्या खाली खनिज संपत्ती असल्याने जमिनीच्या खाली काम करण्यात येईल म्हणून नोंद करण्यात आली असल्याचे खान प्रबंधक पाठक तसेच भ्रष्टाचार्य यांनी सांगितले.शेतकऱ्यांना मायल कडून कसल्याही प्रकारची अडचण देण्यात येणार नाही.असे मत स्पष्ट केले.पण यावर शेतकऱ्यांचे समाधान झाले नाही.

शेतकऱ्यांना  विचारता न घेता आमच्या जमिनीवर लिज ची चढवलेली नोंद  त्वरित हटवा.  सातबारा कोरा करा. हीच मागणी शेतकऱ्यांनी रेटून  धरली.

यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. राजीव पोतदार यांनी शेतकऱ्यांची समजुत काढत केंद्राच्या आदेश असल्याने तहसीलदार यांना  नोंद करणे आवश्यक आहे. त्यांच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही.मायल चे म्हणने ऐकुन घेण्यासाठी ही बैठक आहे. त्यांचे म्हणणे आपण शांतपणे ऐकुन घेतले जर आपले समाधान झाले नाही तर आपण सरकार मधील केंद्रीय मंत्री गडकरी व मायल चे वरिष्ठ पदाधिकारी  यांच्याशी बैठक लावून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू. लवकरच केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेऊन मायल च्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह बैठक आयोजित करण्यात येईल.असे  मत  डॉ. राजीव पोतदार यांनी स्पष्ट केले यावर शेतकरी शांत झाले.

या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष पियुष बुरडे, माजी जि.प. सदस्य अशोक धोटे, विलास ठाकरे, रघुनाथराव राऊत, रमेश बाविसकर सरपंच तिघई,  सुनील लोणारे सरपंच गुमगाव,महेंद्र ठाकरे, छगन कवडे, निखिल आष्टणकर, मनोज शेंडे,रविंद्र डोंगरे, माजी सरपंच संगिता बाविसकर, लक्ष्मीकांत गागोटे आदि खापा परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

बातमी संकलन: किशोर गणवीर 

Previous articleगळफास घेऊन तरुणांची आत्महत्या
Next articleजागतिक वसुंधरा दिवस साजरा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here