Home Health जागतिक वसुंधरा दिवस साजरा…

जागतिक वसुंधरा दिवस साजरा…

89
0

सावनेर (Saoner):- मानवाद्वारे होणारे निसर्गाचे शोषण आणि त्यातून उद्भवलेले संकट सध्या मानवजात अनुभवत आहे. अवकाळी पाऊस, भुसखलन, मृदाधूप, जंगलतोड यातून पर्यावरणाची हानी होत आहे. नैसर्गिक संवर्धन आणि समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येतो. याच प्रसंगाचे औचित्य साधून भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर आणि नेवाजाबाई हितकारिणी महाविद्यालयात ब्रम्हपुरी येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणविषयी आवड, जागरूकता निर्माण व्हावी, कृतिशील नागरिक निर्माण व्हावेत या हेतूने प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात १३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात पायल लांबट, ख़ुशी ढोबळे आणि श्रेया रहाटे या विध्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त केला. तसेच स्मृता सोंधीया, दर्शिका बावनकुळे, जिनत अन्सारी, हर्षदा चौरगडे, सोनल पडोळे, सारंग ठाकरे, ज्ञानेश्वरी बरडे, निकिता हारोडे, निकिता पराते, शुभांगी यादव यांना प्रोत्साहनपर क्रमांक मिळालेत. प्राचार्य डॉ. पराग निमिशे आणि प्राचार्य डॉ. डी. एच. गहाणे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. स्पर्धा कार्यक्रमाचे संयोजक डॉ. विलास डोईफोडे तर डॉ. अरविंद मुंगोले यांनी समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळली.

बातमी संकलन : किशोर गणवीर 

Previous articleसातबारा वरिल लिज चा बोजा त्वरित हटवा…सातबारा कोरा करा.. खापा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी.
Next articleकिसान विरोधी कानून’ या हिंदी पुस्तकाचे नागपूर येथे प्रकाशन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here