Home Breaking News गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या

गळफास घेऊन तरुणांची आत्महत्या

207
0

रामटेक/मनसर (RAMTEK/Mansar):-रामटेक तालुक्यातील मनसर येथे दारूच्या नशेत एका विवाहित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२७ एप्रिल रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, मनसर विटभट्टा, वार्ड क्रमांक २ येथील रहिवासी दिलीप छुटन ठाकरे वय ३० वर्ष. याला दारूचे व्यसन होते.२७ एप्रिलच्या रात्री ९ वाजताच्या सुमारास मृतकाच्या घराजवळील परिसरात बिबट आला असल्याने परिसरातील व मृतकाच्या घरातील सदस्य बिबट्याची हकालपट्टी करायला घराबाहेर गेले.ह्याच वेळेचा डाव साधून दारूच्या नशेत दिलीप याने १० वाजताच्या सुमारास घराच्या फाट्याला गळफास घेतला.काही वेळाने घरातील व्यक्ती परतल्यानंतर घडलेला प्रकार दिसला.त्यांनी तात्काळ दिलीपला उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे नेण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे मृतकाचे शवविच्छेदन करून शव कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.

Previous articleरामटेक येथिल करवाही केंद्रात “महाराष्ट्र माझा ” उपक्रमाची सांगता 
Next articleसातबारा वरिल लिज चा बोजा त्वरित हटवा…सातबारा कोरा करा.. खापा परिसरातील शेतकऱ्यांची मागणी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here