Home Breaking News रामटेक येथिल करवाही केंद्रात “महाराष्ट्र माझा ” उपक्रमाची सांगता 

रामटेक येथिल करवाही केंद्रात “महाराष्ट्र माझा ” उपक्रमाची सांगता 

149
0

रामटेक (Ramtek) – विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीकोनातून पूर्व तयारी व्हावी या उद्देशाने “शिक्षण विभाग”जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबवित आहे.याच धर्तीवर पंचायत समिती रामटेक अंतर्गत करवाही केंद्रातील केंद्रप्रमुख श्री महेंद्र पारसे यांनी “महाराष्ट्र माझा ” हा उपक्रम आपल्या केंद्रातील 10 जिल्हा परिषद व 1 खाजगी शाळांमध्ये राबविला.विशेष म्हणजे यासाठी वेगळी तासिका न घेता सकाळी परिपाठा मध्ये महाराष्ट्रातील विविध घडामोडी तथा विशेष बाबीवर आधारित दररोज 5 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारणे आणि त्यांची उजळणी घेणे या संकल्पनेतून वर्षभर उपक्रम राबविण्यात आला .प्रथम परीक्षा मध्ये एकुण…314 विद्यार्थी सहभागी होते. यातुन दोनही गटातील दि.18/4/23 ला विद्यार्थीची अंतिम परीक्षा घेण्यात आली.

एप्रिल मध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांची जि प उच्च प्राथमिक शाळा माणेगावटेक येथे वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षा घेण्यात आली ज्यामध्ये प्राथमिक गटातून 3 आणि उच्च प्राथमिक गटातून 3 आणि एक चॅम्पियन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली, ज्यामध्ये दुलारा शाळेतील 4 विद्यार्थी माणेगावटेक येथील 1आणि गर्रा शाळेतील 2 विद्यार्थ्यांना ट्रॉफी आणि रोख रकमेसह प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, यावेळी कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मा संगीता तभाने ,विस्तार अधिकारी पंचायत समिती रामटेक उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री गोरडे,मुख्याध्यापक,ज्ञानदिप विद्यानिकेतन यांनी भुषविले.करवाही केंद्राचे केंद्रप्रमुख श्री महेंद्र पारसे यांनी प्रास्ताविक केले तर कार्यक्रमाचे संचालन कु पुसदकर मॅडम यांनी केले.कार्यक्रमात सर्व शिक्षक व  उत्तिर्ण विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.

Previous articleटेकाडी रामसरोवर येथे संरक्षणार्थ शस्त्रविद्या शिबिराला सुरुवात
Next articleगळफास घेऊन तरुणांची आत्महत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here