Home Breaking News खापावासी म्हणतात… निवडणुका केव्हा होणार… समस्या मांडायच्या कुणाकडे?

खापावासी म्हणतात… निवडणुका केव्हा होणार… समस्या मांडायच्या कुणाकडे?

124
0

सावनेर/खापा (Savner/Khapa) ता.23/04/2023  : येथील नगर पालिकेतील नगर सेवक व नगराध्यक्ष यांचा कार्यकाल संपल्याने येथील सर्व पदाधिकारी नगरसेवक आता माजी बनले आहेत.

नगरपालिका सदस्यांचा कार्यकाल संपल्याने येथील कारभार प्रशासक म्हणून सावनेर येथील ऊपविभागीय अधिकारी अतुल म्हात्रे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.खापा नगर पालिकेवर आता प्रशासक राज आहे.इतर मागासवर्गाच्या ओबीसी आरक्षणाच्या तिढा सुटला नसल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत.

खापा नगरपालिकेचा आठ फरवरी 2022 ला कार्यकाल संपला आहे.येथील पालिकेचा कार्यकाल एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला असतांना अजुनही नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नाही. कार्यकाळ संपताच एक-दोन महिन्यातच निवडणुका होईल अशी सर्वांनाच आशा होती. यावरून नवोदित व आजी-माजी नगरसेवकांनी मोर्चे बांधणी सुरू केली होती. नागरिकांची भेटीगाठी सुरू करण्यात आल्या होत्या.पण ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर गेल्याने आजी-माजी नगरसेवकांच्या हिरमोड झाला असल्याचे दिसुन येते.ओबीसी आरक्षणाच्या तिढा अद्याप सुटला नसल्याने निवडणूक आयोगाने नगर परिषदेच्या निवडणुकीला सध्या स्थगिती दिली आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात असून यावर न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर लगेचच निवडणुका घोषित करण्यात येईल असे चिञ दिसून येत आहे.

निवडणू लढण्यास इच्छुक असणारे नवयुवक तसेच राजकीय पुढाऱ्यांचे निवडणुका केव्हा जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खापा नगरपालिकेवर एक सव्वा वर्षापासून प्रशासक असल्याने येथील विकास कामांची गती मंदावली आहे.अपुरे कर्मचारी व प्रभारी मुख्याधिकारी यामुळे नगरपालिकेच्या विकास कामावर याचा विपरीत परिणाम होत आहे.खापा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी ऋचा धाबर्डे यांची मौदा नगरपंचायत ला बदली झाली आहे.तसेच महादुला नगर पंचायत चा पण त्यांचेकडे कार्यभार आहे.येथील मुख्याधिकाऱ्यांना तीन नगरपंचायतच्या कारभार सांभाळावा लागत आहे.

नागरिकांच्या अनेक समस्या असल्याने नगरपालिकेत गेले असता येतील प्रभारी मुख्याधिकारी उपस्थित राहत नसल्याची नागरिकांची ओरड आहे.

कर्मचारी ही उपस्थित राहत नाही.कर्मचाऱ्यांवर कुणाचाच वचक नाही.कर्मचारी जबाबदारीने काम करत नाही.आम्ही समस्या सांगायच्या कुणाला?नगरसेवक होते तेव्हा आम्ही वॉर्डातील समस्या त्यांच्याकडे मांडत होतं. त्यांनी नाही ऐकले तर नगराध्यक्षाकडे जायचे. पण आता नगरसेवक नाही व नगराध्यक्ष ही नाही.मग आम्ही आता समस्या मांडायच्या कुणाकडे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.निवडणूक लांबल्याने नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट आणखी काही महिने कायम राहणार आहे.शहरात अनेक समस्या आहे.नळाला गढूळ पाणी येत असल्याने तसेच भरलेले चेंबर व रस्त्यावर वाहणारे सांडपाणी, विकास कामांकडे दुर्लक्ष आदि समस्या आहे. नागरिकांच्या या समस्याबाबत नुकताच नगरपरिषद कार्यालयावर नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता.यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते.नागरिकांच्या समस्यांकडे नगर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे.अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

बातमी संकलन: किशोर गनविर

Previous articleवन विभागाची कारवाई, राजकीय नेत्यांचे नातेवाईक असल्याने थातुर मातुर कार्यवाही झाल्याची बाब
Next articleटेकाडी रामसरोवर येथे संरक्षणार्थ शस्त्रविद्या शिबिराला सुरुवात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here